आत्मविश्वास वाढवायचाय!.. या 8 गोष्टी वाचा

By admin | Published: March 19, 2017 09:05 AM2017-03-19T09:05:56+5:302017-03-19T09:05:56+5:30

काही जणांमध्ये न्यूनगंडामुळे आत्मविश्वासाची कमी भासत असते व ते स्वतःला कमी लेखू लागतात. म्हणूनच आत्मविश्वास वाढवणं गरजेचं असतं...

Read more about these 8 things | आत्मविश्वास वाढवायचाय!.. या 8 गोष्टी वाचा

आत्मविश्वास वाढवायचाय!.. या 8 गोष्टी वाचा

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - यशस्वी जीवनासाठी आत्मविश्‍वास एक खूप महत्त्वाचा गुण आहे. यश शिखर सर करणा-या बहुतेकांमध्‍ये हा गुण आढळतो. आत्मविश्‍वास एक असा गुण आहे जो प्रत्येकात कमी-अधिक प्रमाणात असतो. मात्र सध्‍याची आत्मविश्‍वासाची पातळी वाढवून ती आणखी वाढवली जाऊ शकते. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट तुम्ही सहज मिळवू शकता. अनेक यशस्वी व्यक्ती या फक्त आत्मविश्वासामुळे मोठ्या झालेल्या असतात. पण काही जणांमध्ये न्यूनगंडामुळे आत्मविश्वासाची कमी भासत असते व ते स्वतःला कमी लेखू लागतात. म्हणूनच आत्मविश्वास वाढवणं गरजेचं असतं...

टेन्शन नही लेने का : सतत हसत रहा. तुम्हाला कितीही टेन्शन असलं तरी ते चेहऱ्यावर दिसू देऊ नका. लोकांशी प्रेमाने बोला व वागा. अपयश आलं तरी त्याचा त्रास करून घेऊ नका. कारण टेन्शन घेतलं कि आत्मविश्वास कमी होत असतो.

पेहरावाकडे लक्ष द्या : तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करता त्याचा तुमच्या आत्मविश्‍वासावर परिणाम होत असतो. चांगले दिसण्‍यांने तुम्ही लोकांना आत्मविश्‍वासाने सामोरे जाऊ शकता. कारण चारचौघात आपण कसे दिसतो अशा शंकांमुळे न्यूनगंड निर्माण होत असतो. म्हणून पेहरावाकडे लक्ष द्या.

यशस्वी लोकांकडे लक्ष द्या : तुमच्या आसपास अशी लोक असतात ज्यांना पाहून तुम्हाला वाटते ती व्य‍क्ती आत्मविश्‍वासाने पूर्ण आहे. अशा लोकांकडे लक्ष्‍य द्या आणि ती करत असलेल्या गोष्‍टी तुमच्या दैनंदिन आयुष्‍यात फॉलो करा. जसे की चालणे, बसणे, बोलताना आय कॉन्टॅक्ट यावर जास्त लक्ष द्या.

प्रयत्न करा : एखादी गोष्ट जमत नसेल तर तिला सोडून देऊ नका, ती पूर्ण करण्यासाठी निदान प्रयत्न तरी करा. कारण प्रयत्न केल्यावरही अपयश आलं तरी त्यातून मिळालेला अनुभवातून तुम्हाला खूप शिकवून जातो. म्हणून प्रयत्न करणं कधीही सोडू नका.

तुलना करूच नका : स्वतःची दुसऱ्या व्यक्तीबरोबर कधीच तुलना करूच नका. कारण समोरचा कसा आहे हे फक्त समोरून दिसत असते. त्याच्याबाबत पूर्ण सत्य आपल्याला माहिती नसते म्हणून त्याच्याशी तुलना करू नका.

मान्य करायला शिका : बदल करण्यासाठी व आत्मविश्वास वाढण्यासाठी कोणतीही गोष्ट मान्य करायला पाहिजे. जसे कि, एखादी गोष्ट तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ती मान्य करा उगाच मिरवत बसू नका. यामुळे पोपट झाल्यास न्यूनगंड निर्माण होतो.

दाबलेल्या आवाजात बोलू नका : तुम्ही जर दबलेल्या आवाजात बोलत असाल तर तर ते आजच बंद करा. कारण यामुळे आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. म्हणून बिनधास्त बोला.

स्वत:ची स्तुती करा : दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून तुमच्यात असलेले सर्व चांगले गुण आठवा व स्वतःची स्तुती करा. यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Web Title: Read more about these 8 things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.