...तर शासनदरबारी वकिली करायला तयार : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 02:13 PM2020-02-10T14:13:56+5:302020-02-10T14:17:01+5:30

...तर ‘मी पुन्हा येईन.

.. Ready to advocate with government: Devendra Fadnavis | ...तर शासनदरबारी वकिली करायला तयार : देवेंद्र फडणवीस 

...तर शासनदरबारी वकिली करायला तयार : देवेंद्र फडणवीस 

Next
ठळक मुद्दे तीर्थक्षेत्र आळंदीत जोग महाराज पुण्यतिथी जन्मशताब्दी सोहळ्यास भेट

आळंदी : सत्तेत असो किंवा नसो; आपण नेहमी सत्कार्य करत राहणार. त्यामुळे वारकरी शिक्षण संस्था संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी वारकरी संप्रदायाची वकिली करायला आपण तयार आहे. महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांच्या समस्या महाविकास आघाडी सरकारकडे जाऊन पूर्ण करून घेऊ, अशी ग्वाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
स्वानंद सुखनिवासी सदगुरू विष्णुबुवा जोग महाराज जन्मशताब्दी सोहळ्यास सदिच्छा भेट देण्यासाठी रविवारी फडणवीस आळंदीत आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार बाबुराव पाचर्णे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, शांतीब्राम्ह ह. भ. प. मारुती महाराज कुर्हेकर, अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे, खजिनदार भालचंद्र नलावडे, शालिनी विखे पाटील, रामायणचार्य रामराव महाराज ढोक, अजित वडगावकर, मुख्याधिकारी समीर भूमकर उपस्थित होते. 
फडणवीस म्हणाले, ज्ञानोबा-तुकोबारायांनी संपूर्ण विश्वाला व्यापक विचार दिला आहे. त्यामुळे भागवत धर्म संस्कृती जपून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. परिणामी त्याचा फायदा संस्कारी पिढी घडविण्यासाठी होत आहे. वारकरी संप्रदायात पुण्य करणाºयांची संख्या जास्त असल्याने कलियुग चालत आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीतील वारकरी संप्रदायाचे किंवा वारकरी शिक्षण संस्थेतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. 
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने विश्वस्त विकास ढगे पाटील व व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांनी प्रास्ताविक केले, तर भालचंद्र नलावडे यांनी सूत्रसंचालन केले.
.....
लोकांचा आशीर्वाद असेल तर ‘मी पुन्हा येईन’
महाविकास आघाडी सरकारने आम्ही मंजूर केलेल्या अनेक मंजूर कामांना स्थगिती दिली आहे. मात्र आळंदीतील कामांना ही स्थगिती लावू नये. विकासकामांची स्थगिती उठविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. लोकांचा आशीर्वाद असेल तर ‘मी पुन्हा येईन’. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते. 

Web Title: .. Ready to advocate with government: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.