ठाण्यात ३५ ओपन जीम होणार सज्ज
By admin | Published: June 16, 2016 02:42 AM2016-06-16T02:42:16+5:302016-06-16T02:42:16+5:30
ठाणेकर नागरिकांच्या आरोग्यासाठी हितकारक ठरणाऱ्या आउटडोअर फिटनेस साहित्य अर्थात, ओपन जीम शहराच्या विविध ३५ ठिकाणी सुरू करण्याचा आरोग्यदायी निर्णय महापालिका
ठाणे : ठाणेकर नागरिकांच्या आरोग्यासाठी हितकारक ठरणाऱ्या आउटडोअर फिटनेस साहित्य अर्थात, ओपन जीम शहराच्या विविध ३५ ठिकाणी सुरू करण्याचा आरोग्यदायी निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. ही कामे नोव्हेंबर, २०१६ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार, आतापर्यंत शहरात विविध ठिकाणी एकूण ११ ठिकाणी ती कामे सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान, आतापर्यंत तीन हात नाका, लुईसवाडी, कचराळी तलाव, मुंब्रा फायर ब्रिगेड, नागरी संशोधन केंद्र नाना-नानी पार्क, कोलशेत खाडी, वृंदावन सोसायटी, बारा बंगला, अक्षयगंगा सोसायटी आणि नक्षत्र उद्यान या ठिकाणी असे जीम निर्माण केले आहे. (प्रतिनिधी)