रेल्वेमध्ये ‘रेडी टू इट’ पदार्थ

By admin | Published: July 18, 2016 04:59 AM2016-07-18T04:59:18+5:302016-07-18T04:59:18+5:30

मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम)‘रेडी टू इट’खाद्यपदार्थ देणारी सेवा सुरू केली

'Ready to eat' substance in the train | रेल्वेमध्ये ‘रेडी टू इट’ पदार्थ

रेल्वेमध्ये ‘रेडी टू इट’ पदार्थ

Next

मुंबई : मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम)‘रेडी टू इट’खाद्यपदार्थ देणारी सेवा सुरू केली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान खाद्यपदार्थांचे पाकीट प्रवाशांना मिळेल आणि ते प्रवाशांसमोरच उकळत्या पाण्यात पाच मिनिटे ठेवून त्यांच्यासमोरच उघडले जाईल. प्रथम गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली असून, अन्य ट्रेनमध्ये सेवा लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली.
आयआरसीटीसीकडून या पूर्वीच खाद्यपदार्थांची सेवा देणारी ‘फूड आॅन ट्रॅक’नावाने ई-कॅटरिंग सेवा सुरू केली आहे. ट्रेनमध्ये आवडते खाद्यपदार्थ मिळवण्यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटद्वारे, तसेच १८00१0३४१३९ किंवा १३९ वर एसएमएस पाठवून सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येत आहे. २0१६ मध्ये जून महिन्यापर्यंत २२ हजार ४११ जणांनी जेवणाची आॅर्डर दिली आणि एकूण ४५ हजार ९५५ साठी जेवण देण्यात आले. प्रत्येक दिवशी सरासरी २४९ जेवणाच्या आॅर्डर येत आहेत. रेल्वेच्या देशभरातील सगळ्या झोनमधून एकूण १ लाख १३ हजार ८८४ आॅर्डर आल्या आहेत. असे असतानाच आयआरसीटीसीकडून ‘रेडी टू इट’नावाने आणखी एक खाद्यपदार्थ पुरवणारी सेवा सुरू करण्यात आली आहे. जूनअखेरीस आयआरसीटीसीने म्हैसूर येथील डिफेन्स फूट रिसर्च लॅबोरेटरीसह करार केला असून, त्यानुसार आरोग्यदायक पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान रेल्वेतील खाद्यपदार्थांसाठी वापरता येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. रेडी टू इटद्वारे प्रवाशांना बंद पाकिटातून खाद्यपदार्थ दिले जातील. खाद्यपदार्थांतील घटकांची पोषणमूल्ये अबाधित ठेवून नवीन तंत्रज्ञानानुसार ते पदार्थ गोठवण्यात आलेले असल्याने, बंद पाकिटांसह पदार्थ उकळत्या पाण्यात पाच
मिनिटे ठेवावी लागतील आणि त्यानंतरच ते पाकिटातून बाहेर
काढून प्रवाशांना खावे लागतील. यामुळे पदार्थाचा दर्जा चांगला राहील आणि आरोग्याला हानीही पोहोचू शकणार नाही, असा दावा आयआरसीटसीकडून करण्यात आला आहे. त्यानुसार, शाकाहारी बिर्याणी, राजमा-भात आणि डाळ-भात प्रवाशांना मिळेल.
>प्रवाशांनी मागणी केलेले बंद पाकिटातील जेवण हे १५0 ग्रॅम ते ३00 ग्रॅमपर्यंत मिळेल. त्याची किंमत ही ४0 रुपये एवढी असेल.
हे पाकीट प्रवाशांसमोरच उकळत्या पाण्यात ठेवले जाईल आणि त्यांच्यासमोरच ते उघडले जाणार आहे.
त्यामुळे रेल्वेला पॅन्ट्री डबा जोडण्याचीही गरज लागणार नाही.

Web Title: 'Ready to eat' substance in the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.