कष्टाने केले स्वप्न साकार
By admin | Published: May 11, 2016 01:06 AM2016-05-11T01:06:40+5:302016-05-11T01:06:40+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक सामान्य कुटुंबांतील तरुणांनी कष्ट आणि जिद्दीने प्रयत्न करून यश मिळविले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशपातळीवरील परीक्षेत आपला ठसा उमटविला
पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक सामान्य कुटुंबांतील तरुणांनी कष्ट आणि जिद्दीने प्रयत्न करून यश मिळविले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशपातळीवरील परीक्षेत आपला ठसा उमटविला.
प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आयएएस मुंबई येथे मेडिकल अभ्यासपूर्ण करत असताना आयएएस अधिकाऱ्यांचे काम जवळून पाहण्याची संधी मिळाली. श्रीकर परदेशी, प्रवीण गेडाम या मेडिकल क्षेत्रातून आयएएस पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून प्रेरणा घेऊन यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. तिसऱ्या प्रयत्नात मला यश मिळाले. माझ्यावर सोपविली जाणारी कोणतीही जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीन, असे राज्यात दुसरा क्रमांक पटकाविणाऱ्या श्रीकृष्णनाथ पांचाळ याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. श्रीकृष्णनाथ पांचाळ म्हणाला, मी मूळचा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील असून, वडील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत तर आई गृहिणी आहे. मुंबई येथील ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमधून मेडिकलची पदवी घेत असताना काही आयएएस अधिकाऱ्यांशी संपर्क आला. त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांमुळे वैद्यकीय क्षेत्रात कोणते बदल घडू शकतात हे पाहता आले. त्यामुळे आपणही यूपीएससी परीक्षेची तयारी करून आयएएस व्हावे, अशी जिद्द उराशी बाळगून मी २0१३पासून परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. अभ्यास झालेला नसल्यामुळे २0१३च्या परीक्षेत मला यश मिळाले नाही. परंतु, २0१४च्या परीक्षेत मी मुलाखतीपर्यंत गेलो. त्यातून माझा आत्मविश्वास वाढला. आता २0१५च्या परीक्षेत देशात सोळावा आणि राज्यात दुसरा क्रमांक मिळाला. आयएएस अधिकारी म्हणून काम करताना अनेक मूलभूत बदल करणारे निर्णय घेता येतात. त्यामुळे जिल्हाधिकारी किंवा आयएएस करण्याचे मी ठरविले. एमपीएससी परीक्षेतून सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून सेवेत रुजू झाल्यानंतर मी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. त्यातही मला १०१२ रँक मिळाली. परंतु मी यूपीएससीची नोकरी अद्याप स्वीकारली नव्हती. मला चांगला रँक मिळाला आहे. स्वत:च तयारी केली. परीक्षेत माझे काय चुकते याचा शोध घेतला आणि त्यात सुधारण करत गेलो. नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केला. त्यातून हे यश मिळाले
- प्रवीण डोंगरे मी नारायणगाव येथील असून, मी कृषी क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. शिक्षण सुरू असतानाच यूपीएससीच्या अभ्यासाची सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळाले. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये यापूर्वी निवड झाली आहे. वडील शेतकरी असून, आई गृहिणी आहे. यापूर्वी सेल्स टॅक्स परीक्षेत निवड झाली असताना वडिलांचे आयएसस व्हायचं स्वप्न पूर्ण करण्याचा आनंद होत आहे.
-पूनम पाटे
> यूपीएससीचे यशवंत-गुणवंतयोगेश कुंबेजकर 8
श्रीकृष्ण पांचाळ 16
सौरभ गहरवार 46
हनुमंत झेंडगे 50
विशू महाजन 70
निखिल पाठक 107
स्वप्निल वानखडे 132
स्वप्निल खरे 197
राहुल पांडवे 200
नवनाथ गव्हाणे 220
हर्षल भोयर 233
मुकुल कुलकर्णी 238
रोहित घोडके 257
अक्षय कोंडे 278
रवींद्र खटाळे 283
आशिष काटे 328
पंकज खंडागळे 340
अक्षय पाटील 344
संजीव चेथुले 354
दत्तात्रेय शिंदे 377
विवेक भस्मे 395
श्रीकांत सुसे 400
रेहा जोशी 425
वासुद तोरसेकर 440
सायली ढोले 448
कपिल गाडे 455
संदीप भोसले 482
स्वप्निल पुंडकर 487
शिबी गहरवार 489
अमित आसरे 490
अदिती वाळूंज 491
पूनम पाटे 497
श्रद्धा पांडे 508
तुषार वाघ 545
विशाल साकोरे 568
देवयानी हालाके 576
प्रसाद मेनकुंदळे 599
प्रवीण डोंगरे 601
आकाश वानखडे 603
किरण जाधव 614
किरण शिंदे 618
हृषीकेश खिल्लारी 627
शरदचंद्र पवार 632
गोपाल चौधरी 635
कुलदीप सोनवणे 636
विशाल नरवडे 640
पवन बनसोड 674
शशांक शेव्हरे 682
श्रुती शेजोळे 690
स्वप्निल कोठवडे 693
राहुल तिरसे 705
विनोद येरणे 709
रामदास काळे 711
स्वप्निल महाजन 720
नितीश पाठोडे 723
रोहन आगवणे 735
समीर पाटील 746
लक्ष्मीकांत सूयर्वंशी 750
प्रांजल पाटील 773
संदीप साठे 775
विक्रम विरकर 784
जय वाघमारे 788
किशोर तांदळे 814
शुभम ठाकरे 817
ओमकारेश्वर कांचनगिरे 820
संदीप पानदुले 826
भूषण भिरुड 829
संघमित्र खोब्रागडे 832
योगेश पाटील 836
रामदास भिसे 851
स्वप्निल चौधरी 862
राहुल गारूड 869
प्रदीप मिरासे 896
रोहित भैसारे 941
अमोघ थोरात 966
योगेश भारसत 1013
राहुल माळी 1057
स्नेहेल भापकर 1062
इंद्रजित पांडे 1075