प्रभू श्रीरामांना मिशी होती? का करण्यात आली त्यांच्या मिशी असलेल्या मूर्तीची मागणी?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 05:40 PM2020-08-04T17:40:13+5:302020-08-04T17:55:20+5:30
अयोध्येतील राम मंदिरात भगवान श्रीरामांच्या मिशी असलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. एवढेच नाही, तर खरी प्रभू श्रीरामांची मूर्ती तर मिशीसहच असायला हवी, यावरही त्यांनी जोर दिला आहे.
नवी दिल्ली/मुंबई - अयोध्येत बुधवारी राम मंदिराच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. यानंतर भव्य राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होईल. या मंदिरात भगवान श्रीरामांच्या मिशी असलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. एवढेच नाही, तर खरी प्रभू श्रीरामांची मूर्ती तर मिशीसहच असायला हवी, यावरही त्यांनी जोर दिला. यानंतर आता यासंदर्भात चर्चेला सुरूवात झाली आहे.
आपल्या देशात अनेक ठिकानी मिशीसह देवांच्या मूर्ती आहेत. मात्र, त्या फारशा आढळत नाहीत. संभाजी भिडे यांनी, जोर देत म्हटले आहे, की जर भगवान श्रीरामांची मूर्ती मिशी नसणारी असेल, तर ती योग्य प्रकारे प्रभू रामांना प्रगट करणार नाही.
मात्र, अपवाद वगळता जगभरात श्रीरामांची जेवढी मंदिरं आणि मूर्ती आहेत, त्या सर्व मिशी नसणाऱ्याच आहेत. यामुद्द्यावर चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
त्रेता युगात कशी होती परंपरा -
प्रभू श्री रामांच्या आवताराचे वर्णन वेदांमध्ये आहे. मात्र त्यात त्यांना मिशी होती किंवा नाही याचा उल्लेख आढळत नाही. मात्र, ते ज्या युगात होऊन गेले, त्याला त्रेता यूग म्हणून संबोधले जाते. तेव्हा सनातन धर्मात सर्वसाधारण पणे मिशी आणि दाट दाढी ठेवण्याची पद्धत होती.
इंदौरमध्ये प्रभू श्रीरामांची मिशी असलेली मूर्ती -
देशात काही मंदिरे अशीही आहेत, जेथे मिशी असलेली श्रीरामांची मूर्ती आहे. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये असेच एक मंदिर आहे. येथे केवळ श्रीरामच नव्हे, तर लक्षमणाचीही मिशी असलेली मूर्ती आहे. हे मंदिर कुमावतपुरा येथे आहे. तसेच हे मंदिर 150 वर्ष जुने असल्याचे म्हटले जाते.
हनुमानाचीही मिशी असलेली मूर्ती -
लोकांची अशी धारणा आहे, की राज दशरथ यांना दाढी-मिशी असू शकते, तर श्रीरामांनाही दाढी-मिशी नक्कीच असणार. या शिवाय राजस्थानातील एका मंदिरात मिशी असलेली हनुमाची मूर्ती आहे. हे मंदीर हनुमानांच्या मीशी मुळेच लोकप्रिय आहे.
ब्रह्मदेव वगळता कोणत्याही देवाची मूर्ती दाढी-मिशी असलेली नाही -
हिंदू धर्मात ब्रह्मदेव वगळता साधारणपणे कुठल्याही देवाची मूर्ती दाढी-मिशी असलेली नाही. काही ठिकाणी भगवान शंकरांची मिशी असलेली मूर्ती दिसून येते. मात्र, विष्णू, श्रीकृष्ण, श्रीराम आणि इतरही काही देवांच्या मूर्ती शक्यतो मिशी नसणाऱ्याच दिसतात. सर्वसाधारणपणे देवाची मूर्ती युवावस्थेतीलच तयार केली जाते. एवढेच नाही, तर उत्तर आणि दक्षिण भारतातही देवांच्या युवावस्थेतील मूर्तींनाच मान्यता आहे. ऋग्वेदात केवळ दोन ठिकाणी 'राम' शब्दाचा उल्लेख आढळतो. (१०-३-३ तथा १०-९३-१४).
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
उद्धव ठाकरे अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनात सहभागी होणार? संजय राऊतांनी दिलं असं उत्तर
5 ऑगस्टला अयोध्येतच राहणार उमा भारती, भूमिपूजनात सहभागी होणार नाही; सांगितलं हे 'मोठं' कारण
'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला
तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...