विनावातानुकूलित शयनयान एसटी आली रे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 06:39 AM2018-07-10T06:39:38+5:302018-07-10T06:40:08+5:30

एसटी महामंडळातील बहुप्रतीक्षित विनावातानुकूलित (नॉन एसी स्लीपर) शयनयान एसटीची बांधणी नुकतीच पूर्ण झाली आहे.

Really welcome! | विनावातानुकूलित शयनयान एसटी आली रे!

विनावातानुकूलित शयनयान एसटी आली रे!

Next

मुंबई : एसटी महामंडळातील बहुप्रतीक्षित विनावातानुकूलित (नॉन एसी स्लीपर) शयनयान एसटीची बांधणी नुकतीच पूर्ण झाली आहे. पुणे येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्टच्या (सीआयआरटी) मंजुरीनंतर लवकरच ही विनावातानुकूलित शयनयान एसटी प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.
परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी २० जानेवारी २०१८ रोजी अत्याधुनिक वातानुकूलित शिवशाहीसोबत विनावातानुकूलित शयनयान एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची घोषणा केली होती. यानुसार महामंडळाच्या पुणे येथील मध्यवर्ती कार्यशाळेत विनावातानुकूलित शयनयान एसटीची बांधणी पूर्ण करण्यात आली.
महामंडळाची प्रोटोटाइप म्हणून ही बस बांधलेली आहे. पुणे येथील सीआयआरटीने प्रमाणित केल्यानंतर तब्बल एक हजार बसची बांधणी करण्यात येईल. २ बाय १ अशा प्रकारची ३० आसने या शयनयान एसटीत आहेत. ही एसटी आंतरराज्य मार्गावर रातराणीच्या जागेवर धावेल.
रात्री प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता यावा, म्हणून महामंडळाने विनावातानुकूलित शयनयान बस बांधण्याचा निर्णय घेतला होता. रातराणीच्या सध्या ६०० बस राज्यभर धावत आहेत. रातराणीच्या तिकीट दरांमध्ये विनावातानुकूलित शयनयान प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
 

Web Title: Really welcome!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.