Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे आणखी दोन आमदार फुटणार? शिंदे गटाने टाकले फासे; उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 12:13 PM2022-08-28T12:13:34+5:302022-08-28T12:14:49+5:30

Maharashtra Political Crisis: उद्धव सेनेत सध्या मुक्कामी असलेले दोन आमदार लवकरच शिंदे सेनेत येणार आहेत, असा दावा करण्यात आल्याने उद्धव ठाकरेंची चिंता वाढल्याचे सांगितले जात आहे.

rebel sandipan bhumare claims two mla will join shinde group from uddhav thackeray shiv sena group | Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे आणखी दोन आमदार फुटणार? शिंदे गटाने टाकले फासे; उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले!

Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे आणखी दोन आमदार फुटणार? शिंदे गटाने टाकले फासे; उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले!

googlenewsNext

Maharashtra Political Crisis: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढत चाललेला पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीयपणे राज्यभरात दौरे करताना दिसत आहेत. मात्र, यातच आता शिवसेनेतून आणखी दोन आमदार फुटणार असून, लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा शिंदे गटातील मंत्र्यांनी केला आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सतत पडझड सुरु असलेल्या शिवसेनेला आणखी दोन हादरे बसण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे आमदार आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी लवकरच शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटतील, असा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. तसे घडल्यास हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरू शकतो. अगदी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले कोणते दोन शिलेदार त्यांची साथ सोडणार, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

उद्धव सेनेत मुक्कामी दोन आमदार लवकरच शिंदे सेनेत येणार 

संदीपान भुमरे यांनी पैठण येथील कार्यक्रमात बोलताना हा दावा केला. भुमरे यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव सेनेत सध्या मुक्कामी असलेले दोन आमदार लवकरच फुटून शिंदे सेनेत येणार आहेत. एक जण येऊन आम्हाला भेटला असून दुसरा सुद्धा संपर्कात असल्याचे भुमरे यांनी सांगितले. भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला प्रचंड गर्दी झाली होती. हाच धागा पकडत संदीपान भुमरे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले. पैठणच्या बिडकीन गावात आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या सभेपेक्षा गारुड्याच्या खेळाला जास्त गर्दी होते, अशी खोचक टिप्पणी संदीपान भुमरे यांनी केली. 

दरम्यान, कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भुमरे पहिल्यांदाच पैठण शहरात आले होते. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी संदिपान भुमरे यांच्यावर टीका केली. सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई अशी 'देश भ्रमंती' करून राज्याचे रोजगार मंत्री संदीपान भुमरे पहिल्यांदाच मतदारसंघात प्रगटले. त्यांच्या स्वागताला पैठणमधील काही नागरिकांसह खूप रिकाम्या खुर्च्यांची उपस्थिती होती!, अशी खोचक टिप्पणी अंबादास दानवे यांनी केली.
 

Web Title: rebel sandipan bhumare claims two mla will join shinde group from uddhav thackeray shiv sena group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.