बंडखोर झाले शांत

By admin | Published: October 1, 2014 11:37 PM2014-10-01T23:37:05+5:302014-10-01T23:37:05+5:30

जवळपास सर्वच मतदारसंघांत प्रमुख पक्षांतील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होत़े माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर वरिष्ठांच्या फोनाफोनीनंतर त्यांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत़

The rebels became calm | बंडखोर झाले शांत

बंडखोर झाले शांत

Next
पुणो : जवळपास सर्वच मतदारसंघांत प्रमुख पक्षांतील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होत़े माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर वरिष्ठांच्या फोनाफोनीनंतर त्यांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत़ जिल्ह्यात आजअखेर 174 जणांनी माघार घेतली असून 21 मतदारसंघांत आता 3क्8 जण रिंगणात आहेत़ 
दौंडमधून भाजपाचे बंडखोर नामदेव ताकवणो यांनी माघार घेतली आहे. भोरमधून राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी होण्याची शक्यता होती. तिकीट नाकारल्याने रणजित शिवतरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पुढची भूमिका दोन दिवसांत ठरवू, असे सांगितले होते. मात्र, अद्याप त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही तर कालर्पयत पक्षाने आपल्याला वारंवार डावलल्याची सल व्यक्त करीत रघुनाथ किंद्रे यांनी अपक्ष लढणार, असे पत्रकार परिषदेत जाहीर केले. मात्र, आज त्यांनीही आर्ज मागे घेतला. 
वडगाव शेरी मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक डॉ़ सिद्धार्थ धेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता़ मात्र, त्यानंतर भाजप आणि रिपब्लिकन पक्षात युती झाली व रिपाइंला पिंपरी मतदारसंघ सोडण्यात आला़ त्यानुसार पिंपरीतून रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांना उमेदवारी देण्यात आली असून भाजपने अगोदर उमेदवारी दिलेले अमर साबळे यांनी माघार घेतली आह़े त्याचप्रमाणो पुणो कँटोन्मेंटमधून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार नवनाथ कांबळे यांनी माघार घेतली आह़े मात्र, वडगाव शेरीमधून डॉ़ सिद्धार्थ धेंडे यांनी आपला अर्ज तसाच ठेवला आह़े पर्वतीमधून कॉंग्रेसचे उपमहापौर आबा बागुल यांच्या पत्नी जयश्री बागुल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला़ तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवलाल भोसले यांनीही माघार घेतली़ शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपचे तिकीट मिळविण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे नगरसेवक दत्ता बहिरट यांनी आज सकाळी औंध येथे कार्यकत्र्याचा मेळावा घेतला होता़ कार्यकत्र्यानी निवडणूक लढविण्याचा आग्रह केला; पण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फोन करून या परिस्थितीत आपण उमेदवारी मागे घेण्यास सांगितल़े त्यानंतर दत्ता बहिरट आणि माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांनी अर्ज मागे घेतल़े कसबा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नगरसेवक उदयकांत आंदेकर, राजा तुंगतकर यांनी आज अर्ज मागे घेतला़ मात्र, बंडू आंदेकर यांनी बंडखोरी कायम ठेवली आह़े पिंपरीमधून भाजपचे अमर साबळे, राजेश पिल्ले यांनी माघार घेतली़  हडपसरमधून उपमहापौर बंडू गायकवाड, दिलीप तुपे यांनी माघार घेतली़  (प्रतिनिधी)
 
4जिल्ह्यात 561 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होत़े त्यांतील 79 जणांचे अर्ज छाननीत बाद झाले व 481 जणांचे अर्ज वैध ठरले होत़े उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी 174 जणांनी अर्ज मागे घेतल़े, त्यामुळे आता 21 मतदारसंघांत 3क्8 जण रिंगणात उरले आहेत़ 
 
4दौंडची जागा भाजपने राष्ट्रीय समाज पक्षाला दिली असूनही तेथून भाजपचे प्रदेश भटक्या विमुक्त संघटनेचे सरचिटणीस पांडुरंग मेरगळ तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजाराम कदम यांनी बंडखोरी केली आह़े जुन्नरमधून काँग्रेसचे मारुती वायाळ यांनी बंडखोरी केली आह़े वडगावशेरीमधून रिपब्लिकन पक्षाचे डॉ़ सिद्धार्थ धेंडे आणि भाजपचे जगदीश मुळीक या दोघांचेही उमेदवारी अर्ज राहिले आहेत़  

 

Web Title: The rebels became calm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.