बंडखोर लागले ‘भाव’ खायला
By admin | Published: October 1, 2014 12:22 AM2014-10-01T00:22:34+5:302014-10-01T00:22:34+5:30
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर अचानक भाजपा व शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली.
Next
>पुणो : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर अचानक भाजपा व शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली. त्यामुळे विधानसभेसाठी अनेक इच्छुकांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. अटीतटीची निवडणूक असल्याने अपक्ष उमेदवारांचे माघारीसाठी ‘भाव’ वधारले आहेत. पक्षाच्या मोठय़ा नेत्यांचा फोन आला पाहिजे, निवडणुकीच्या तयारीचा खर्च निघाला पाहिजे; अन्यथा ठोस आश्वासनाशिवाय माघारी न घेण्याची अपेक्षा उमेदवारांना आहे.
यंदा पहिल्यांदाच शहरातील आठही मतदारसंघांत पंचरंगी निवडणूक होत आहे. प्रत्येक मतदारसंघात अनेक बंडखोरांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार दोन दिवसांपासून संबंधितांची समजूत काढण्यावर भर देत आहेत. त्यानंतर प्रमुख पक्षाचे शहराध्यक्ष व पदाधिकारी यांच्याकडूनही बंडखोरी शमविण्यासाठी बैठका सुरू आहेत. उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासूनच अपक्ष बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, माघारीचा दिवस जवळ आल्याने अपक्ष उमेदवारांचा भाव वाढत चालला आहे. काँग्रेसमधील शिवाजीनगर, पर्वती, कोथरूड व हडपसर मतदार संघासह सर्वच मतदारसंघांत बंडखोरांना शांत करण्याचे प्रमुख पक्षांचे शहराध्यक्ष यांचे काम
सुरू आहे. उद्या दुपारी 3 र्पयत
बंडखोरी मिटविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न होतील. (प्रतिनिधी)
च्राज्यात पंचरंगी लढतीमुळे कोणाची सत्ता येणार, हे अनिश्चित असल्यामुळे प्रत्येक इच्छुकाला आमदार होण्याची आशा आहे. परंतु, पक्षातून एकाच इच्छुकाला उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणा:यांना विधान परिषदेच्या आश्वासनांचे वेध लागले आहेत.