नोटा बंदीमुळे आठवडा बाजारात ग्राहकांची मंदी

By admin | Published: November 13, 2016 04:46 PM2016-11-13T16:46:27+5:302016-11-13T16:46:27+5:30

यंदाच्या रविवारच्या आठवडा बाजाराला हजार, पाचशेच्या नोटा बंदीची झळ ग्राहकांच्या मंदीमुळे बसल्याचे दिसून आले.

Recalling the ban on the customers, the market sentiment declined | नोटा बंदीमुळे आठवडा बाजारात ग्राहकांची मंदी

नोटा बंदीमुळे आठवडा बाजारात ग्राहकांची मंदी

Next

राजू काळे/ऑनलाइन लोकमत
भाईंदर, दि. 13 - मीरा-भार्इंदरमधील नागरिकांसाठी सोईस्कर ठरलेल्या यंदाच्या रविवारच्या आठवडा बाजाराला हजार, पाचशेच्या नोटा बंदीची झळ ग्राहकांच्या मंदीमुळे बसल्याचे दिसून आले. भार्इंदर पश्चिमेकडील स्टेशन रोडवर दर रविवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारात शहरासह आसपासच्या ठिकाणचे विक्रेते येत असतात. हा बाजार स्थानिकांना सोईस्कर ठरत असल्याने श्रीमंतापासुन गरीबांपर्यंतची लोकं या बाजारात आवश्यक वस्तु खरेदीसाठी येत असतात. प्रत्येक सणवारीलाही हा बाजार ग्राहकांच्या गर्दीने फुलून जातो.

महत्वाचा ठरलेला हा आठवडा बाजार ऐन वाहतुकीच्या रस्त्यावर भरत असल्याने तेथे होणारी वाहतूक कोंडी लोकांच्या अंगवळणी पडल्याने ग्राहकांची या बाजारात विनातक्रार खरेदी सुरूच असते. सततच्या वाहतुक कोंडीमुळे हा बाजार येथील दिडशे फुट मार्गावरील सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ स्थलांतरीत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. सुरक्षिततेच्या कारणसास्तव त्याला पोलिसांकडुन नकारघंटा मिळाल्याने हा बाजार जैसे थे आहे. शिवाय या बाजारामुळे बाजार कर वसुल करणा-या कंत्राटदारांचे चांगभले होत असल्याने बाजाराच्या स्थलांतराला अप्रत्यक्षपणे विरोध केला जात आहे. हवी तशी कर वसुली होत असली तरी या बाजारात चांगले ग्राहक तसेच उत्पन्न मिळत असल्याने विक्रेते या बाजारात वस्तू विकण्यासाठी प्रत्येक आठवड्याला आवर्जून येत असतात.

दर आठवड्याला बाजारात होणा-या गर्दीवरून विक्रेत्याची उलाढाल प्रत्येकी किमान दीड हजार ते कमाल २५ हजार रु. इतकी होत असते. नेहमी ग्राहकांच्या गर्दीने फुललेला हा बाजार १३ नोव्हेंबरच्या रविवारी तुरळक गर्दीचा दिसला. गेल्या ९ नोव्हेंबरपासून बंदी घालण्यात आलेल्या हजार, पाचशेच्या नोटा मिळविण्यासाठी व्यस्त असलेल्या ग्राहकांनी यंदाच्या बाजाराकडे पाठ फिरविल्याची चर्चा विक्रेत्यांमध्ये सुरु होती. परंतु, ज्यांनी नोटा बदलुन घेतल्या, त्यांतील काहींनी बाजारात जाणे पसंत केले. त्यातही बदलुन मिळालेल्या नवीन नोटा दोन हजारांच्या असल्याने सुट्टे पैशांअभावी विक्रेत्यांनी त्या स्विकारल्या नसल्याचे सांगितले. एका बाजुला लोकांची बँकांच्या बाहेर गर्दी तर आठवडा बाजार ग्राहक मंदीचा असल्याचे दिसुन आले. अपेक्षित ग्राहकांअभावी अनेक विक्रेते ग्राहकांच्या प्रतिक्षेत बसुन होते. याबाबत विक्रेते अफजल खान म्हणाले, यापुर्वीच्या आठवडा बाजारात दुपारी एक पर्यंत किमान १५ हजार रुपयांचा व्यवसाय होत होता, तो यंदा केवळ नोटांच्या गोंधळामुळे ग्राहक रोडावल्याने १० टक्के सुद्धा झाला नाही. तसेच विक्रेते शिवलाल यादव म्हणाले, अनेक ग्राहक जुन्या हजार, पाचशेच्या नोटा देत होते. तर काही दोन हजारांच्या नोटा देत होते. जुन्या नोटा स्वीकारल्या नसल्या तरी नवीन नोटा सुट्या पैशांअभावी परत कराव्या लागल्या. यामुळे व्यवसायावर विपरित परिणाम झाला.

Web Title: Recalling the ban on the customers, the market sentiment declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.