स्टेशन परिसरात पुन्हा फेरीवाल्यांचे बस्तान

By admin | Published: November 3, 2016 03:42 AM2016-11-03T03:42:04+5:302016-11-03T03:42:04+5:30

ठाणे रेल्वे स्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात दिवाळीपासून पुन्हा एकदा फेरिवाल्यांनी बस्तान बसवले आहे.

Reclamation Stations in Station Area | स्टेशन परिसरात पुन्हा फेरीवाल्यांचे बस्तान

स्टेशन परिसरात पुन्हा फेरीवाल्यांचे बस्तान

Next


ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात दिवाळीपासून पुन्हा एकदा फेरिवाल्यांनी बस्तान बसवले आहे. पालिकेतील वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर कारवाईसाठी आग्रही असतांना दुसरीकडे कनिष्ष्ठ अधिकाऱ्यांचा मात्र त्यांच्यावर वरदहस्त असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आता दिवाळी संपल्यानंतरदेखील गोखले रोड, शिवाजी पथ आणि बाजारपेठेतील इतर पदपथांवर पुन्हा एकदा त्यांनी कब्जा केला आहे.
मागील काही दिवसांपासून स्टेशन परिसरातील फेरिवाल्यांच्या मुद्यावरुन व्यापारी आणि पालिकेत खटके उडाले असतांना आता पुन्हा फेरीवाल्यांचा बाजार फुलला आहे. मागील आठवड्यात ही कारवाई काही काळ सातत्याने करण्यात सुरु होती. परंतु, दिवाळी निमित्ताने तिला काहीसा ब्रेक लागला. याचाच फायदा घेऊन पुन्हा या भागात त्यांनी आपले बस्तान मांडण्यास सुरवात केली आहे. सायंकाळी नावापुरती नौपाडा प्रभाग समितीची गाडी फेरी मारते. तेव्हा फेरीवाले सरावल्यासारखे पळतात.
>आता हवी माणुसकी
ठाणे पालिकेने बायोमेट्रिक सर्वेक्षण केलेल्या फेरीवाल्याचे पुनर्वसन होत नाही तोवर कारवाई करू नये, अशी फेरीवाल्यांची मागणी होती. तसा सर्व्हे झाला. आता माणुसकीच्या दृष्टीकोनातून कारवाई करु नये, अशी त्यांच्या नेत्यांची मागणी आहे.

Web Title: Reclamation Stations in Station Area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.