नवीन महाविद्यालये, तुकड्यांची मान्यता रोखली
By admin | Published: May 3, 2015 04:53 AM2015-05-03T04:53:10+5:302015-05-03T04:53:10+5:30
राज्यात नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात आल्यानंतर गतवर्षी महाविद्यालयात सुमारे २५ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या
मुंबई : राज्यात नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात आल्यानंतर गतवर्षी महाविद्यालयात सुमारे २५ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. चालू शैक्षणिक वर्षातही नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात असल्याने महाविद्यालयात वाढीव प्रवेश क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे
२0१५-१६ या शैक्षणिक वर्षात राज्यात पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची नवीन महाविद्यालये आणि तुकड्यांना मान्यता न देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे.
ग्रामीण, डोंगराळ, आदिवासी, नक्षलग्रस्त, शहरी इत्यादी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यामध्ये नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात येते. २0१३-१४ या शैक्षणिक वर्षात राज्यात नवीन महाविद्यालये आणि अतिरिक्त तुकड्यांना मान्यता देण्यात आली होती.
परंतु मागील वर्षी महाविद्यालयांमध्ये २५ टक्के जारा रिक्त राहिल्या होत्या. तसेच २0१४-१५ या शैक्षणिक वर्षात नवीन महाविद्यालये, तुकड्यांना मान्यता देण्यात
आली आहे. त्यामुळे महाविद्यालयांतील जागांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २0१५-१६ मध्ये राज्यात अकृषी विद्यापीठाच्या पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची नवीन महाविद्यालये आणि तुकड्यांना मान्यता न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात राज्यात एकही नवीन महाविद्यालय सुरू होणार नाही. यामुळे नवीन महाविद्यालये सुरू करणाऱ्या संस्थांना आता त्या पुढील शैक्षणिक वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. (प्रतिनिधी)