‘आंतरिक’ शक्ती ओळखा : रविना टंडन

By admin | Published: December 5, 2014 10:52 AM2014-12-05T10:52:27+5:302014-12-05T11:06:20+5:30

भारतीय महिलांमध्ये जी शक्ती आहे ती जगातील कुठल्याही महिलेमध्ये पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आपल्यातील ‘आंतरिक’ शक्तीला ओळखा, असा मूलमंत्र प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन हिने महिलांना दिला.

Recognize the 'inner' power: Ravi Tandon | ‘आंतरिक’ शक्ती ओळखा : रविना टंडन

‘आंतरिक’ शक्ती ओळखा : रविना टंडन

Next

पुणे : भारतीय महिलांमध्ये सर्व गोष्टी करण्याची अफाट क्षमता आहे. नोकरी करीत असूनही कुटुंबातील प्रत्येक जबाबदारी त्या उत्कृष्टपणे सांभाळतात. त्यांच्यामध्ये जी शक्ती आहे ती जगातील कुठल्याही महिलेमध्ये पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आपल्यातील ‘आंतरिक’ शक्तीला ओळखा, असा मूलमंत्र प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन हिने महिलांना दिला. कल्पना चावला किंवा सुनीता विल्यम्ससारख्या भारतीय वंशाच्या महिलांनी अंतराळाला गवसणी घातली, हे एक भारतीय महिलाच करू शकली, तुम्हीदेखील स्वत:चे वेगळेपण सिद्ध करू शकता, अशी भावना तिने महिलांच्या मनात चेतविली. रविना म्हणाली, ‘‘तुम्ही स्वत: आई होणार आहात, मग आपल्या तान्हुल्याचा जीव घेण्याचा अधिकार तुम्ही दुसऱ्यांना देऊच कशा शकता. अशा महिलांमुळे कुटुंबाची चव बिघडू शकते. आपल्या मुलांवर कशा प्रकारचे संस्कार करीत आहात, हेही लक्षात घेतले पाहिजे. महिलांचा सन्मान करण्याची बीजं लहानपणापासूनच त्यांच्या मनात रुजली गेली पाहिजेत.’’

अखियोंसे गोली मारे...
रवीना टंडन यांना डोळ्याचे इन्फेक्शन असूनही ‘वुमेन समिट’मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘ गॉगल हा काही माझा फॅशन सिम्बॉल नाही तर माझ्यामुळे कोणाला इन्फेक्शन होऊ नये म्हणून घातला आहे. नाहीतर ‘अखियोंसे गोली मारे... असं व्हायचं.

...तर त्याला महिलाही तितक्याच ‘दोषी’
‘स्त्री’ ही कुटुंबाचे बलस्थान आहे. एकाच वेळी ती घरातील सर्व जबाबदाऱ्या अत्यंत ताकदीने निभावू शकते; पण कुटुंबाची तिला साथ मिळणे आवश्यक आहे. आजही स्त्रीभ्रूणहत्या किंवा हुंडाबळीसारख्या घटना घडत आहेत, मात्र यामध्ये कुटुंबातील महिलाही तितकीच जबाबदार आहे. घरात जर अशी कृत्ये होत असतील तर त्याला महिलाही तितक्याच ‘दोषी’ आहेत. महिलांनी त्याचा प्रतिकार केला पाहिजे. शांत राहून डोळ्यांसमोर अन्याय होत असलेला पाहणे हादेखील एक गुन्हाच आहे.
--------------
चॅलेंज स्वीकारलं आणि यशस्वी झाले : उषा काकडे

या वेळी संजय काकडे ग्रुपच्या उपाध्यक्षा उषा काकडे यांच्याशी संवाद साधला. आपल्या व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीचे गमक काय, असे विचारले असता काकडे म्हणाल्या, ‘‘कुठलाही व्यवसाय वाढला की घरातील मंडळींची मदत लागतेच. तशी माझीही मदत मागितली गेली. शिक्षण कमी होते तरीही चॅलेंज म्हणून जबाबदारी स्वीकारली. स्टाफला बरोबर घेऊन व्यवसायातील खाचा-खोचा जाणून घेतल्या. छोट्या-छोट्या गोष्टीतून शिकत गेले. १२ वर्षे झाली, २२ कंपन्यांचे अकाउंट्स सांभाळत आहे.’’

Web Title: Recognize the 'inner' power: Ravi Tandon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.