टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा अभिमत दर्जा काढण्याची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 01:46 AM2018-12-26T01:46:52+5:302018-12-26T01:47:00+5:30
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या (टिमवि) कारभारात सातत्याने अनियमितता आढळून येत असल्याने त्यांचा अभिमत विद्यापीठाचा दर्जा काढून घेण्याची शिफारस केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) बैठकीत घेण्यात आला आहे
पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या (टिमवि) कारभारात सातत्याने अनियमितता आढळून येत असल्याने त्यांचा अभिमत विद्यापीठाचा दर्जा काढून घेण्याची शिफारस केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) बैठकीत घेण्यात आला आहे.
यूजीसीने ५३५ वी बैठक नुकतीच झाली, त्याचे इतिवृत्त त्यांनी संकेतस्थळावर प्रकाशित केले आहेत. टिमविला अभिमत विद्याापीठाचा दर्जा का काढण्यात येऊ नये ही अशी कारणे दाखवा नोटिस काही दिवसांपूर्वी बजावण्यात आली होती. त्याला टिमवीकडून समाधानकारक उत्तर न आल्याने ही शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे टिमवीच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांचा अभिमत विद्यापीठाचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतल्यास तेथील अभ्यासक्रमाना दुसऱ्या विद्यापीठाची संलग्नता घ्यावी लागेल.