पुनर्विचार याचिकेने मिळाली ‘उभारी’

By admin | Published: August 14, 2014 10:11 AM2014-08-14T10:11:27+5:302014-08-14T10:11:27+5:30

गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासमेवत झालेल्या बैठकीत पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे गोविंदा पथकांना ‘उभारी’ मिळाली असून, सर्व गोविंदांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

Reconsideration plea gets 'broiler' | पुनर्विचार याचिकेने मिळाली ‘उभारी’

पुनर्विचार याचिकेने मिळाली ‘उभारी’

Next
>गोविंदांमध्ये जल्लोष : राज्य शासनाच्या मध्यस्थीनंतर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
 
मुंबई : गेले दोन महिने गोविंदांचा सराव, यंदाच्या उत्सवाचे आकर्षण आणि थरांच्या विश्वविक्रमाच्या चर्चेऐवजी बालगोविंदांवर बंदी आणि थरांच्या उंचीवर र्निबधांनीच वातावरण तापले होते. त्यामुळे गोविंदा खेळणा-या तरुणांच्या उत्साहावर विरजण आल्यामुळे सर्वच गोविंदा पथकांमध्ये नाराजी दिसून आली. परंतु आज गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासमेवत झालेल्या बैठकीत पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे गोविंदा पथकांना ‘उभारी’ मिळाली असून, सर्व गोविंदांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
मागच्या काही दिवसांपासून दहीहंडीवर संबंधित विषयांवर सुरू असलेल्या चर्चेमुळे गोविंदा खेळाडूंचा उत्साहच निघून गेला होता. मात्र आता राज्य शासनाने मध्यस्थी केल्यामुळे सकारात्मक चित्र दिसत असून दहीहंडीचा जोश परतला आहे, अशी भावना ताडदेव नवमहाराष्ट्र गोविंदा पथकाचे सुरेंद्र पांचाळ यांनी व्यक्त केली. गोविंदा पथकांना उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश त्वरित स्वीकारणो शक्य नव्हते. त्याऐवजी न्यायालयाने पर्यायाने राज्य शासनाने आमचीही बाजू लक्षात घेऊन त्यावर सुवर्णमध्य काढावा, अशी आमची मागणी होती. त्यामुळे राज्य शासनाने उचललेले पाऊल सकारात्मक असून, गेले कित्येक दिवस नियमित सराव करणा:या गोविंदांच्या खेळाडूंना ‘एनर्जी’ देणारेच आहे, अशी प्रतिक्रिया माझगाव गोविंदा पथकाचे प्रशिक्षक अरुण पाटील यांनी व्यक्त केली.  दहीहंडी उत्सवावर घातलेल्या र्निबधामुळे सर्वात जास्त कोंडी महिला गोविंदा पथकांची झाली आहे. 
त्यामुळे आम्हाला उत्सव साजरा करता येणार का, या संभ्रमात असताना राज्य शासनाने केलेली मध्यस्थी दिलासा देणारी ठरली आहे. या पुनर्विचार याचिकेमुळे 
पुन्हा महिला गोविंदा पथकांना उत्सवात तितक्याच उत्साहाने सहभागी होता येईल, असे गोरेगावच्या स्वस्तिक गोविंदा पथकाच्या संचालिका आरती बारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
कशासाठी केला हा अट्टाहास ? गेल्या वर्षीचे गोविंदा अजूनही घेत आहेत उपचार 
> दरवर्षी दहीहंडीच्या दिवशी सुमारे 14 ते 15 गोविंदा केईएम रुग्णालयात दाखल होतात. यापैकी 50 ते 75 टक्के गोविंदाना कायमचे अपंगत्व येते, असे केईएम रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक्स विभागाचे डॉ. सुधीर श्रीवास्तव यांनी सांगितले. गेल्या वर्षी 16 आणि 17 वर्षाची दोन मुले गोविंदाच्या दिवशी केईएम रुग्णालयात दाखल झाली होती. आजही ती रुग्णालयामध्ये उपचारासाठी येत आहेत. दोघांनाही कायमचे अपंगत्व आले आहे.
 
> 16 वर्षाचा मुलगा पडल्यामुळे त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. यामुळे त्याला 1क् महिने केईएम रुग्णालयात राहावे लागले होते. त्याला एक कृत्रिम पाय बसवण्यात आला आहे. या पायाच्या आधारे तो चालू शकतो, मात्र त्याला काम करण्यावर मर्यादा आल्या आहेत. तर दुस:या 17 वर्षीय मुलाचा उजवा पाय अजूनही पूर्णपणो बरा झालेला नाही. त्याच्या पायाला स्टॅण्ड लावण्यात आला आहे. त्याला अजूनही उपचारासाठी केईएममध्ये यावे लागते. त्याचा पाय पूर्णपणो बरा होणो तसे कठीणच आहे, असे डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले.
 
> जखमी होणा:या गोविंदांना प्रामुख्याने दोन प्रकारच्या जखमा होतात. गोविंदांना मणका, हात-पायाला मार लागतो आणि डोक्याला मार लागतो. मणक्याला मार बसल्यास येणारे अपंगत्व हे अनेकदा कायमस्वरूपी असते. कारण मणक्याला दुखापत झाल्यास तेथील पेशींची वाढ पुन्हा होत नाही. दरवर्षी आम्ही दहीहंडीच्या दिवशी तरुण मुलांना अपंग होताना बघता याचे खूप वाईट वाटते. एका दिवसापायी मुलांना आयुष्यभरासाठी अपंगत्व येते, याचा विचार सगळ्य़ांनीच केला पाहिजे. गोविंदांना दहीहंडीऐवजी विविध खेळ खेळण्याची संधी दिली, खेळांचा सराव केला तर महाराष्ट्र खेळामध्ये पुढे जाईल आणि  येणा:या अपंगत्वाचे प्रमाण कमी होईल, असे डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले.   
 
राजेंद्रला कायमचे अपंगत्व.. 
3 ऑगस्ट रोजी केईएममध्ये दाखल केलेल्या राजेंद्र बैकर यांच्यावर 5 ऑगस्टला मणका जागेवर बसवण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. मानेच्या मणक्याला बसलेल्या मारामुळे त्यांना हातापायाची हालचाल करता येणो शक्य नाही. बैकर यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी त्यांना यापुढे स्वत:हून उठून बसता अथवा चालता येणार नाही. याच मानेच्या मणक्यातील एखादा चेतातंतू तुटल्यास तो परत तयार होत नाही. यामुळेच त्या व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व येते. याचबरोबरीने बैकर यांना पुढे जाऊन श्वास घ्यायलाही त्रस होऊ शकतो, असे ऑर्थाेपेडिक्स विभागाचे डॉ. सुधीर श्रीवास्तव यांनी सांगितले.  
 
> गेल्या आठवडय़ात केईएम रुग्णालयात दाखल झालेल्या 14 वर्षीय आदर्श वने याच्याही डोक्याला मार लागला होता. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणो तो शुद्धीवर आला आहे. मात्र त्याच्या डोक्याला झालेली जखम गंभीर आहे आणि त्यामुळे तो झोपेतच असतो. न्यूरो विभागातील डॉक्टर त्याची सकाळ-संध्याकाळ तपासणी करीत असून, अजूनर्पयत त्याच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात येणार नसल्याचे केईएम रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बांगर यांनी दिली.
 
आतार्पयत 6 गोविंदा केईएम रुग्णालयात
> गोविंदा पथकांनी दहीहंडीचा सराव चालूच ठेवला आहे. वरळी येथे मंगळवारी रात्री सरावादरम्यान 4 गोपिका जखमी झाल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल केले. वॉर्ड क्रमांक 7 (सजर्री वॉर्ड) मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आता केईएममधील गोविंदांची संख्या 6 वर गेली आहे .
 
> मंगळवारी दाखल केलेल्या गोपिकांचे अनिता कोळी, प्रिया, रेणुका आणि श्रद्धा अशी  नावे आहेत. अनिताच्या पायाच्या हाडाला मार लागला असून, प्रिया आणि श्रद्धा यांच्या डोक्याला मार लागला आहे, तर रेणुकाच्या छातीला मार लागला आहे. या चौघींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 
------------------
दहीहंडीवरील र्निबधामुळे उत्सव साजरा करणो कठीण झाले असते. त्यामुळे कालच्या पत्रकार परिषदेतील तरुणाईची संख्या, त्यांच्या भावना लक्षात घेऊन राज्य शासनाने आज घेतलेली भूमिका अतिशयक दिलासा देणारी आहे. या भूमिकेमुळे आम्हाला पुन्हा एकदा दहीहंडी उत्सव पूर्वीप्रमाणो साजरा करता येईल, अशी प्रतिक्रिया यंग उमरखाडी गोविंदा पथकाचे कमलेश भोईर यांनी व्यक्त केली.
 

Web Title: Reconsideration plea gets 'broiler'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.