हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना

By Admin | Published: September 15, 2015 02:27 AM2015-09-15T02:27:01+5:302015-09-15T02:27:01+5:30

हिंदी दिवसाच्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना केली असून तावडे हे अकादमीचे अध्यक्ष तर प्रा. नंदलाल पाठक यांची कार्याध्यक्षपदी

Reconstruction of Hindi Sahitya Akademi | हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना

हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना

googlenewsNext

मुंबई : हिंदी दिवसाच्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना केली असून तावडे हे अकादमीचे अध्यक्ष तर प्रा. नंदलाल पाठक यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक विभागाचे सचिव हे अकादमीचे सचिव असतील व याखेरीज २५ जणांची सदस्यपदी निवड केलेली आहे. त्यामध्ये पुष्पा भारती, ब्रिजमोहन पांडे, कुसुम जोशी, इंद्रबहाद्दूर सिंग, संजय भारद्वाज, हरी गोविंद विश्वकर्मा, राजेश्वर ओजियाल, प्राचार्य गणपत राठोड, अभिमन्यू शितोळे, हस्तीमल हस्ती, राघवेंद्र द्विवेदी, पंडित किरण मिश्रा, प्रकाश दुबे, शितल पांडे, घनश्याम अगरवाल, अशोक सहारे, वीरेंद्र अस्थाना, सुनील सिंह, निरंजन परीहार यांचा समावेश असून हिंदी साहित्य अकादमीचे सहसंचालक हे सचिव असतील. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Reconstruction of Hindi Sahitya Akademi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.