दहावी उत्तीर्णतेचा विक्रम !

By admin | Published: June 9, 2015 04:33 AM2015-06-09T04:33:50+5:302015-06-09T04:33:50+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या निकालाच्या टक्केवारीने प्रथमच नव्वदी ओलांडली आहे.

Record of 10th pass! | दहावी उत्तीर्णतेचा विक्रम !

दहावी उत्तीर्णतेचा विक्रम !

Next

मुंबई/ पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या निकालाच्या टक्केवारीने प्रथमच नव्वदी ओलांडली आहे. यंदा निकाल ९१.४६ टक्के लागला असून, त्यात मुलींनीच बाजी मारली आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात ३.१४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९१.४६ टक्के असून, कोकण विभागाचा सर्वाधिक ९६.५४ टक्के तर लातूर विभागाचा सर्वात कमी ८६.३८ टक्के इतका आहे.
दहावी परीक्षेचा निकाल मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी जाहीर केला.

मुलींचा निकाल ९२.९४ टक्के
च्दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या १५ लाख ७७ हजार ३०३ विद्यार्थ्यांपैकी १५ लाख ७२ हजार २६८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यातील १४ लाख ३७ हजार ९२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नियमित मुलींचा निकाल ९२.९४ टक्के असून, मुलांचा निकाल ९०.१८ टक्के आहे. - आणखी वृत्त/२

१ लाख ५९ हजार २२६ विद्यार्थ्यांना ४५ ते ६० टक्के
च्रात्र शाळांचा निकाल ६१.३३ टक्के असून, अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ८७.४७ टक्के लागला आहे. राज्यातील ९० टक्क्यांहून अधिक टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४८ हजार ५८३ आहे, तर ४५ ते ६० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ५९ हजार २२६ आहे.

Web Title: Record of 10th pass!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.