दोन लाख पासपोर्टचे विक्रमी वितरण

By admin | Published: January 1, 2015 12:52 AM2015-01-01T00:52:31+5:302015-01-01T00:52:31+5:30

जानेवरी ते डिसेंबर २०१४ या कालावधीमध्ये २ लाख ९ हजार ६०४ पासपोर्टचे वितरण करून विक्रमी कामगिरी नोंदविली आहे.

Record distribution of two lakh passport | दोन लाख पासपोर्टचे विक्रमी वितरण

दोन लाख पासपोर्टचे विक्रमी वितरण

Next

दीपक जाधव - पुणे
पासपोर्ट मिळण्यामध्ये असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असल्याने वर्षभरापूर्वी टीकेचे लक्ष्य ठरलेल्या पुणे पासपोर्ट कार्यालयाने दर महिन्याला विशेष मेळाव्याचे आयोजन, अपॉइंटमेंटच्या संख्येत वाढ, तक्रारींचे तातडीने निराकरण आदी उपाययोजना राबविल्या. त्यामुळे जानेवरी ते डिसेंबर २०१४ या कालावधीमध्ये २ लाख ९ हजार ६०४ पासपोर्टचे वितरण करून विक्रमी कामगिरी नोंदविली आहे.
पुणे पासपोर्ट विभागांतर्गत पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर या ६ जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे शहरासह इतर सहाही जिल्ह्यांमधून पासपोर्ट काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. पुणे विभागातून २००५ मध्ये ६८ हजार पासपोर्ट वितरित करण्यात आले होते. त्यानंतर २०१३ पर्यंत त्यामध्ये दर वर्षी १० ते १५ हजारांची वाढ होत होती. मात्र, २०१३ ते २०१४ या दोन वर्षांत पासपोर्ट काढणाऱ्यांच्या संख्येत तब्बल ५० हजारांनी वाढ झाली आहे.
पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया संपूर्णपणे आॅनलाइन करण्यात आली आहे. पासपोर्ट हा आंतरराष्ट्रीय पातळीवर नागरिकत्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे त्याकरिता केल्या जाणाऱ्या अर्जातील माहिती अत्यंत काटेकोरपद्धतीने भरणे आवश्यक असते; तसेच यासाठी पुरावा म्हणून सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांची पडताळणीही अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी, या प्रक्रियेमध्ये अनेक सुधारणा राबविण्यास सुरूवात केली.
अपॉइंटमेंट मिळत नसल्याच्या अडचणींवर मात करण्यासाठी महिन्यातून दोन वेळा विशेष मेळावे भरविण्यात येऊ लागले. दररोज सर्वसाधारण एक हजार, तर तत्काळच्या ११० अपॉइंटमेंट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर दोन महिने पुढची अपॉइंटमेंट दिली जायची, आता ते अंतर एक महिन्यापर्यंत कमी झाले आहे.

च्पासपोर्टची मुदत संपल्यानंतर नूतनीकरणासाठी अर्ज केल्यास त्याच दिवशी कागदपत्रांची पडताळणी करून पासपोर्टची छपाई केली जाते. त्यानंतर तुमचा
पासपोर्ट पोस्टाने घरी पाठविण्यात आल्याचा मेसेज अर्जदाराच्या मोबाईलवर पाठविला जात आहे.
च्पासपोर्ट अर्जधारकांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर लगेच पासपोर्टची छपाई करून ते घरपोच पाठविले जात आहेत. सध्या प्रिटिंगअभावी एकही अर्ज प्रलंबित नसल्याची माहिती प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली. पूर्वी तक्रारींनी भरला जाणारा ईमेल बॉक्सवर कौतुकाचे तसेच आभाराचे मेसेज येत असल्याचे गोतसुर्वे यांनी सांगितले.

२००५६८०४४
२००६९४२४३
२००७१०७९५५
२००८१२०७८६
२००९११३२५९
२०१०१२९५१४
२०१११४११८४
२०१२१४६७५६
२०१३१७८४७६
२०१४२०९६०४

Web Title: Record distribution of two lakh passport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.