गांधीजींच्या संकेतस्थळाला विक्रमी हिट्स

By admin | Published: October 5, 2015 02:39 AM2015-10-05T02:39:16+5:302015-10-05T02:39:16+5:30

विविध संघटनांच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या www.mkgandhi.org या संकेतस्थळाला महात्मा गांधी जयंतीदिनी विक्रमी हिट्स मिळाल्या आहेत

Record hits to Gandhiji's website | गांधीजींच्या संकेतस्थळाला विक्रमी हिट्स

गांधीजींच्या संकेतस्थळाला विक्रमी हिट्स

Next

मुंबई : . दोन दिवसांत या संकेतस्थळाला २ लाख नागरिकांनी भेट दिली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा यामध्ये १ लाख हिट्सची वाढ झाली आहे. देशासह जगभरातून या संकेतस्थळाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
गांधीयन आॅर्गनायझेशन, बॉम्बे सर्वोदय मंडळ आणि मुंबई आणि गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव या संस्थांमार्फत www.mkgandhi.orgहे संकेतस्थळ गेल्या १५ वर्षांपासून चालविण्यात येत आहे. ते दररोज अपडेट करण्यात येते. सहा विविध आत्मचरित्रं, गांधी यांच्या कार्याचे १00 भाग, यासह आॅनलाइन बुक, ५00 फोटो, विविध विषयांवरील ८00 लेख असे साहित्य मोफत उपलब्ध आहे. २ आॅक्टोबरच्या गांधी जयंतीदिनी जगभरातून या संकेतस्थळाला लाखो नागरिकांनी भेट दिल्याचे बॉम्बे सर्वोदय मंडळाने कळविले आहे.
१ आणि २ आॅक्टोबर रोजी गांधीजींबद्दलची माहिती मिळविण्यासाठी
३ लाख नागरिकांनी संकेतस्थळाला भेट दिली आहे. सर्वसाधारणपणे या संकेतस्थळाला ९ हजार ५00 नागरिक भेट देतात. परंतु गांधी जयंतीदिनी जगभरातील नागरिकांनी बापूंचे कार्य आणि जीवन जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
१ आणि २ तारखेला संकेतस्थळाला ३ लाख हिट्स मिळाल्या. १ आॅक्टोबर रोजी ५६ हजार ७0२ आणि २ आॅक्टोबरला ७३ हजार २५६ नागरिकांनी संकेतस्थळाला भेट दिली आहे. यासह हजारो परदेशी नागरिकांनीही या संकेतस्थळाला भेट दिल्याचे मंडळाने कळविले आहे.

Web Title: Record hits to Gandhiji's website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.