विक्रमी ‘मानक’ची घोडदौड आता कोपरगावात

By Admin | Published: April 27, 2015 03:23 AM2015-04-27T03:23:44+5:302015-04-27T03:23:44+5:30

बर्नाला ते पुष्कर अशी ७०० कि़मी़ अंतराची मोहीम १० दिवसांत पार करून विक्रम नोंदविणारा ‘मानक’ कोपरगावकरांचे आकर्षण बनला आहे़ संपूर्ण काळा आणि

The record of the record 'standard' is now in Kopargaon | विक्रमी ‘मानक’ची घोडदौड आता कोपरगावात

विक्रमी ‘मानक’ची घोडदौड आता कोपरगावात

googlenewsNext

पंडित भारुड, संवत्सर (जि़नगर)
बर्नाला ते पुष्कर अशी ७०० कि़मी़ अंतराची मोहीम १० दिवसांत पार करून विक्रम नोंदविणारा ‘मानक’ कोपरगावकरांचे आकर्षण बनला आहे़ संपूर्ण काळा आणि डोक्यावर पांढरा टिक्का असल्याने त्यास ‘काळा टिक्का’ म्हणूनही संबोधले जाते़ हा काळा टिक्का कोपरगावमध्ये चौखूर उधळतो आहे़
छत्रपती शिवरायांची कृष्णा, महाराणा प्रताप यांचा चेतक तसेच झाशीच्या राणीच्या घोडीने थोर महात्म्यांना साथ दिली़ सूर्याचे वाहन असलेला अश्व, प्रगतीचे, वेगाचे व भरभराटीचे प्रतीक आहे़ कोपरगावातील संदीप निर्मळ या तरुणाने बर्नाला येथून ११ लाख रुपयांत खरेदी केलेला ‘मानक’ सध्या कोपरगावकरांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Web Title: The record of the record 'standard' is now in Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.