सानंदांकडून १० लाख वसूल करा

By admin | Published: December 22, 2015 02:25 AM2015-12-22T02:25:47+5:302015-12-22T02:25:47+5:30

दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २००६मध्ये माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना एका प्रकरणात संरक्षण दिल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला केलेला

Recover 10 Lacs from Sanand | सानंदांकडून १० लाख वसूल करा

सानंदांकडून १० लाख वसूल करा

Next

नागपूर : दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २००६मध्ये माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना एका प्रकरणात संरक्षण दिल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला केलेला १० लाख रुपये दंड सानंदांच्याकडून वसूल करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने सोमवारी दिले.
शासनाने सर्वोच्च न्यायालयात १० लाख रुपये दंड जमा केला होता. हे पैसे करदात्यांचे आहेत. त्यामुळे सानंदा ही रक्कम शासनाला परत करावी, अशी भूमिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी घेतली. सानंदा यांनी न्यायालयाच्या निर्देशावरून उत्तर सादर करून दंड भरण्यास नकार दिला होता. सानंदा यांचा खामगाव नगर परिषदेतील घोटाळ्याप्रकरणीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Recover 10 Lacs from Sanand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.