एअरटेल, वोडफोन, आयडियाकडून 3,050 कोटी दंड वसूल करा - ट्राय
By admin | Published: October 22, 2016 09:55 AM2016-10-22T09:55:02+5:302016-10-22T10:14:13+5:30
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी (TRAI)ने भारती एअरटेल, वोडफोन आणि आयडिया कंपन्याना 3,050 कोटी रुपये दंड ठोठावण्याची शिफारस दूरसंचार विभागाला केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी (TRAI)ने भारती एअरटेल, वोडफोन आणि आयडिया कंपन्याना 3,050 कोटी रुपये दंड ठोठावण्याची शिफारस दूरसंचार विभागाला केली आहे. एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया नेटवर्कशी रिलायंस जिओ ग्राहकांकडून केले जाणारे फोन जोडले जात नाहीत त्यात अडथळे येतात त्यामुळे हा दंड वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे. भारती एअरटेल आणि वोडाफोनच्या प्रत्येकी 21 वर्तुळासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, याचनुसार आयडिया कंपनीच्या 19 सर्कलसाठी दंड ठोठवला जाणार आहे.
5 सप्टेंबर रोजी रिलायंस जिओने आपली सेवा सुरू केल्यानंतर, ग्राहकांचा कंपनीला भरभरुन मिळाला. मात्र काही दिवसांनंतर अन्य नेटवर्कशी फोन जोडला जात नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या. या पार्श्वभूमीवर, 'अन्य मोबाईल कंपन्या जिओ ग्राहकांना फोन जोडणी उपलब्ध करुन देत नाहीत, त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे',अशी तक्रार जिओ कंपनीने 'ट्राय'कडे तक्रार केली. यानंतर 'ट्राय'ने दूरसंचार विभागाला या तीन मोठ्या कंपन्यांवर दंड लावण्याची शिफारस केली आहे.
आणखी बातम्या
'संबंधित कंपन्या नियम आणि अटींचे पालन करत नसल्याचे दिसत आहे. जिओ नेटवर्क ग्राहकांना अन्य नेटवर्कसोबत जोडू न देण्यामागे संबंधित कंपनीशी स्पर्धा होऊ न देणे आणि ग्राहकांच्या हिताविरोधी भूमिका आहे', असे सांगत ट्रायने फटकारले आहे. दरम्यान, ग्राहकांची असुविधेमध्ये आणखी भर पडू नये याची काळजी घेत कंपन्यांचा परवाना रद्द करण्याची शिफारस न केल्याचेही ट्रायने सांगितले आहे. एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया नेटवर्कने जिओ ग्राहकांना इंटरकनेक्शन सुविधा न पुरवल्याने 75 टक्के कॉल अन्य नेटवर्कशी जोडलेच गेले नाही, असे रिलायंस जिओचे म्हणणे आहे.
नियमांनुसार, एक हजार कॉलमध्ये 5 पेक्षा अधिक कॉल जोडण्यात अपयशी होऊ नयेत. मात्र, रिलायन्स जिओ प्रकरणात जवळपास 960 कॉल अन्य मोबाईल नेटवर्कशी जोडलेच जाऊ शकले नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, दंडाविषयी बोलण्यासाठी जेव्हा कंपन्यांना संपर्क करण्यात आला तेव्हा त्यांनी या संदर्भात बोलणे टाळले.