समुपदेशकांकडून वसुली

By Admin | Published: January 4, 2017 12:57 AM2017-01-04T00:57:40+5:302017-01-04T00:57:40+5:30

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत असणाऱ्या समुपदेशकांना देण्यात आलेल्या अतिरिक्त मानधनाची वसुली करण्यात येत आहे. मानधन कमी करण्यात आल्याचा

Recovery from Counselor | समुपदेशकांकडून वसुली

समुपदेशकांकडून वसुली

googlenewsNext

- मिलिंद कीर्ती, चंद्रपूर

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत असणाऱ्या समुपदेशकांना देण्यात आलेल्या अतिरिक्त मानधनाची वसुली करण्यात येत आहे. मानधन कमी करण्यात आल्याचा आदेश उशिरा प्राप्त झाल्याने ही वसुली करण्यात येत आहे. त्यामुळे या समुपदेशकांना आधीच मानधन
कमी मिळत असताना आता त्यांच्यावर अत्यल्प मिळकतीचे गंडांतर आले आहे.
२०१२ मध्ये विदर्भातील चंद्रपूर, अमरावती, वर्धा, वाशिम, गडचिरोली व भंडारा या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनअंतर्गत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (एनपीसीडीसीएस) सुरू करण्यात आला.
त्यानंतर या कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात
आली. जून-२०१२ मध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर पदांवर
कर्मचारी-अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली. त्या वेळी समुपदेशकांना कृती अंमलबजावणी आराखड्यात (पीआयपी) १२ हजार रुपये मासिक मानधन देण्यात आले.
तसेच एनआरएचएमच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मानधनात आठ टक्के वाढ देण्यात आली. त्यानंतर २०१५-१६ मध्ये मानधनात पाच टक्के वाढ देण्यात आली.
या दरवाढीप्रमाणे समुपदेशकांना आॅगस्ट-२०१६ पर्यंत १४ हजार २०८ रुपये मासिक मानधन देण्यात आले. त्यानंतर २०१६-१७ च्या पीआयपीमध्ये अचानक त्यांचे मानधन १० हजार रुपये करण्यात आले. तोपर्यंत एप्रिल ते आॅगस्टपर्यंत १४ हजार २०८ रुपयांप्रमाणे मानधन देण्यात आले होते. आता त्या सहा महिन्यांच्या १० हजार रुपयांपेक्षा अधिक दिलेल्या मानधनाची वसुली सुरू करण्यात येत आहे.
मुंबई येथील आरोग्य भवनात सहसंचालक (असंसर्गजन्यरोग)
डॉ. साधना तायडे यांच्याशी
संपर्क साधल्यावर त्यांनी केंद्र सरकारच्या स्तरावर मानधन कमी करण्यात आल्याचे सांगितले.
तसेच केंद्राकडे सुधारित
पीआयपी पाठविण्यात आल्याची माहितीही दिली.

१४ हजारांऐवजी १० हजार इतके मानधन
आधी समुपदेशकांना १४ हजार रुपये मानधन दिले जात होते. आता १० हजार रुपये मानधन मंजूर झाले आहे. केंद्रीय स्तरावरून ही रक्कम मंजूर झाली आहे. जिल्हास्तरावरून मागणी आल्यानंतर ती राज्यस्तरावरून केंद्राकडे पाठविण्यात आली आहे. केंद्राकडून सुधारित पीआयपी प्राप्त झालेले नाही, असे नागपूर येथील सर्कल प्रोग्रॅम मॅनेजर नंदनवार यांनी सांगितले.

सध्या प्रत्येक महिन्याला जुन्या मानधनाची कपात केली जात आहे. त्यामुळे हातात केवळ अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत मानधन मिळते. एवढ्या कमी वेतनामध्ये कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे कठीण होत आहे.
- राम बारसागडे, समुपदेशक, चंद्रपूर

Web Title: Recovery from Counselor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.