राज्यात सात हजार पोलिसांची भरती; पुढील वर्षी आणखी दहा हजार पदे भरण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 05:27 AM2022-05-20T05:27:38+5:302022-05-20T05:28:25+5:30

या निमित्ताने पोलीस दलात सहभागी होण्याची मोठी संधी तरुणाईला मिळणार आहे.

recruitment of 7000 policemen in the state preparing to fill another ten thousand posts next year | राज्यात सात हजार पोलिसांची भरती; पुढील वर्षी आणखी दहा हजार पदे भरण्याची तयारी

राज्यात सात हजार पोलिसांची भरती; पुढील वर्षी आणखी दहा हजार पदे भरण्याची तयारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याच्या पोलीस दलात लवकरच सुमारे सात हजार पोलीस शिपायांची भरती करण्यात येणार आहे. पुढील महिन्यापासून त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे गृहविभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाने या भरतीला यापूर्वीच मंजुरी दिली होती. तथापि, राज्यात कोरोनाकाळामुळे ही भरती प्रक्रिया हाती घेता आलेली नव्हती. या भरतीसाठी पारदर्शक पद्धत अवलंबिली जाईल. ही प्रक्रिया एकाचवेळी हाती घेतली जाईल आणि एक ते दीड महिन्यांच्या कालावधीत ती पूर्ण करण्यात येणार आहे. पोलीस भरतीतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरतीचे नियम आणि निकष अधिक कडक करण्यात येणार आहेत. पोलीस भरतीचा हा दुसरा टप्पा असेल.

या आधी पहिल्या टप्प्यात पाच हजार पोलिसांची भरती करण्यात आली होती. तिसऱ्या टप्प्यात पुढील वर्षी आणखी दहा हजार पदे भरून पोलीस पदांचा अनुशेष दूर करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न असेल. या निमित्ताने पोलीस दलात सहभागी होण्याची मोठी संधी तरुणाईला मिळणार आहे.

गडचिरोलीत स्थानिकांना प्राधान्य

गडचिराेली : काेराेना संकट तसेच पाेलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांची बिंदूनामावली अद्ययावत नसल्याने पाेलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया घेण्यात आली नाही. गडचिराेलीत पाेलीस शिपायांच्या १३६ जागा भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेत सर्वाधिक ७८ जागा इतर मागासवर्गासाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ३७, इतर प्रवर्गाला ३ ते ७ जागा आहेत. पदभरती जाहिरात निघाली आहे. सर्व १३६ जागा गडचिराेली जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांमधूनच भरण्यात येणार आहेत.
 

Web Title: recruitment of 7000 policemen in the state preparing to fill another ten thousand posts next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.