'येथे' थेट मुलाखतीद्वारे अधिकारी पदांसाठी भरती, पगार 1 लाखहून अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 10:06 AM2020-11-03T10:06:48+5:302020-11-03T10:08:21+5:30
अर्ज करण्याची पद्ध आणि निवडप्रक्रियेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती ncl-india.org वर जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये सर्व माहिती बघून ऑनलाईन अर्ज करावा.
नवी दिल्ली - नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये टेक्निकल ऑफिसर, वरिष्ठ टेक्निकल ऑफिसर, फायर सेफ्टी ऑफिसर तसेच इतरही काही पदांसाठी भरती होत आहे. यासाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. 10वी पासपासून ते पदवीधर उमेदवारांपर्यंत नोकरीची संधी आहे. येथे एकूण 45 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेत पास व्हावे लागेल. मात्र, वरिष्ठ पदांसाठी, थेट मुलाखतीच्या माध्यमाने भरती करण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्ध आणि निवडप्रक्रियेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती ncl-india.org वर जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये सर्व माहिती बघून ऑनलाईन अर्ज करावा.
NCL Recruitment 2020: जारी पदांची माहिती -
टेक्निशियन - 20
टेक्निकल असिस्टंट - 10
टेक्निकल ऑफिसर - 12
सीनियर टेक्निकल ऑफिसर - 02
सीनियर टेक्निकल ऑफिसर (फायर सेफ्टी) - 01
एकूण पदे - 45
आवश्यक पात्रता -
अधिकारी पदासाठी अर्ज करताना, उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये B.E./B.Techची पदवी, तसेच निर्धारित अनुभव असणे आवश्यक आहे. तर, टेक्नीशियन पदांसाठी सायंस स्ट्रिममधून 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. पदानुसार उमेदवारांच्या वयाची पात्रताही वेगवेगळी आहे. उमेदवारांनी सविस्तर माहिती अधिकृत नोटिफिकेशनमध्ये पहावी.
UR/ EWS /OBC कॅटेगिरीच्या उमेदवारांसाठी अर्जासाठीची फीस 100/- रुपये आहे. तर इतर आरक्षित कॅटेगिरीतील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शुल्क नाही. 2 नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची अखेरची तारीख 02 डिसेंबर आहे. तसेच उमेदवारांना आपल्या अर्जाची हार्ड कॉपी 31 डिसेंबरपर्यंत देण्यात आलेल्या पत्त्यावर पाठवावी लागेल.
फॉर्म अथवा अर्ज पाठवण्याचा पत्ता -
प्रशासनिक अधिकारी
CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा
डॉ. होमी भाभा मार्ग, पुणे – 411008 (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अप्लाय करण्यासाठी येथे क्लिक करा