Pune Metro: पुणे मेट्रोमध्ये नोकर भरती; ITI, इंजिनिअर, डिप्लोमाधारकांना मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 04:22 PM2020-12-24T16:22:20+5:302020-12-24T16:23:16+5:30

Pune Metro Rail Recruitment 2020 – 2021: पुणे मेट्रोचे काम जोरात सुरु आहे. काही महिन्यांत मेट्रोच्या चाचण्यादेखील घेतल्या जाणार आहेत. यामुळे मेट्रोने भरती सुरु केली आहे.

Recruitment in Pune Metro; Great opportunity for ITI, Engineer, Diploma holders | Pune Metro: पुणे मेट्रोमध्ये नोकर भरती; ITI, इंजिनिअर, डिप्लोमाधारकांना मोठी संधी

Pune Metro: पुणे मेट्रोमध्ये नोकर भरती; ITI, इंजिनिअर, डिप्लोमाधारकांना मोठी संधी

Next

Pune Metro Rail Bharti 2020 -21 पुणेमेट्रोमध्ये वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 


टेक्निशिअन, स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर, सेक्शन इंजिनिअर, ज्युनिअर इंजिनिअर आदी जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांना मेट्रोच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. एकूण १३९ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन पुणेद्वारे (Maharashtra Metro Rail Corporation Pune) हे अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2021 आहे. 


शिक्षणाची अट...

  • टेक्निशिअनसाठी आयटीआय (NCVT / SCVT). 
  • स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटरसाठी - तीन वर्षांचा इंजिनिअर डिप्लोमा इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, मान्यताप्राप्त विद्यापीठ. 
  • सेक्शन इंजिनिअर - 4 वर्षे इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण. 
  • ज्युनिअर इंजिनिअर - तीन वर्षांचा इंजिनिअर डिप्लोमा 

 

शुल्क 
खुल्या प्रवर्गासाठी 400 रुपये आणि राखीव वर्गासाठी 150 रुपये फी आकारण्यात येणार आहे. परीक्षा आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 


अर्ज कसा कराल...
नोटिफिकेशन पाहण्यासाठी, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...

अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा ... 

SBI SO Recruitment 2020, Sarkari Naukri Job 2020: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यानुसार स्पेशालिस्ट ऑफिसरच्या रिक्त असलेल्या 452 पदांवर भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. ११ जानेवारीपर्यंत उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. 

बँकेने सर्व विभागातील वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची पहिली प्रिलिम्स परीक्षा फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. याच्या तारखा लवकरच जाहीर करण्य़ात य़ेणार आहेत. 

शैक्षणिक अट
मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्टॅटिक्स किंवा गणित किंवा अर्थशास्त्रामध्य़े पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असायला हवी. यामध्ये ६० टक्क्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. MBA, MGDM आणि BTech पदवी असलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. 
मॅनेजर पदासाठी वयोमर्यादा 25 ते 45 वर्षे आहे. डेप्युटी मॅनेजर पदासाठी 21 ते 35 वर्षे आहे. तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी 28 ते 30 वर्षे आहे. इंजिनिअर पदांसाठी 40 वर्षे आहे. यासाठी 23 हजार ते 51 हजार रुपये एवढा पगार दिला जाणार आहे. 

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा...

 

IDBI Bank Recruitment 2020: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) मध्ये अधिकारी बनण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आयडीबीआयने (IDBI Bank) स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (Specialist Cadre Officer) पदांसाठी भरती काढली आहे.

 
पदवीधारकांपासून ते इंजिनिअर आणि सीए शिकलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीची माहिती, नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. 

पदे : 
डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड-डी) - 11 पदे
असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड-सी) - 52 पदे
मॅनेजर (ग्रेड-बी) - 62 पदे
असिस्टंट मॅनेजर (ग्रेड-ए) - 09 पदे
एकूण पदांची संख्या - 134

LIC मध्ये भरती; विना परिक्षा होणार निवड, 14 लाखांपर्यंतचे पॅकेज

अर्ज कसा कराल? 
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आयडीबीआय बँकेच्या वेबसाईट idbibank.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात २४ डिसेंबर २०२० पासून होत आहे. ७ जानेवारी २०२१ शेवटची तारीख असणार आहे. अर्जासाठीची लिंक पुढे देण्यात आली आहे. 

निवड कशी होईल? 
या पदांसाठी आलेल्या अर्जांद्वारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे.  यानंतर त्यांना ग्रुप डिस्कशन / पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. 

Government Jobs: कॅशिअर, इलेक्ट्रीशियन, क्लार्क, नर्ससाठी शेकडो पदांवर भरती; केंद्र सरकारी नोकरीची संधी

Bank of Baroda Recruitment 2020-21: बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officers) पदांच्या जागा निघाल्या आहेत. बँक ऑफ बडोदाने या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन काढले आहे. यानुसार या पदांवर ८ जानेवारी  २०२१ पर्यंत अर्ज भरायचे आहेत. इच्छुक उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. 

Read in English

Web Title: Recruitment in Pune Metro; Great opportunity for ITI, Engineer, Diploma holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.