५० लाख लीटर पाण्याचा पुनर्वापर

By Admin | Published: June 8, 2016 03:49 AM2016-06-08T03:49:09+5:302016-06-08T03:49:09+5:30

महाराष्ट्रावर आलेल्या पाणीटंचाईच्या संकटात जनतेला जलबचतीची आणि त्याच्या पुनर्वापराची सवय लागावी

Recycling of 50 lakh liters of water | ५० लाख लीटर पाण्याचा पुनर्वापर

५० लाख लीटर पाण्याचा पुनर्वापर

googlenewsNext


मुंबई : महाराष्ट्रावर आलेल्या पाणीटंचाईच्या संकटात जनतेला जलबचतीची आणि त्याच्या पुनर्वापराची सवय लागावी आणि एकूणच जलसाक्षरता निर्माण होण्याच्या उद्देशाने ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या जलमित्र अभियानातील सहा आठवड्यांमध्ये राज्यभरात ५० लाख लीटर पाण्याची बचत करून त्याचा पुनर्वापर करण्यात आला. या अभियानात २ लाख ७६ हजार ८०० नागरिक आणि ‘लोकमत’च्या वाचकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जलबचतीसंदर्भातील गांभीर्याची त्यांनी साक्ष पटवून दिली.
राज्यभरात जलमित्र अभियानाचा प्रारंभ मेच्या पहिल्या आठवड्यात झाला. त्यानंतरच्या सुमारे दीड महिन्यात राज्यातील ६५२ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल्समध्ये जाऊन तेथील व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना जलबचतीचा संदेश देण्यात आला. शिवाय हॉटेल्समधील वापरलेले पाणी साठविण्यासाठी बॅरेल्स देण्यात आले. या बॅरेलमध्ये दररोज साठविण्यात येणाऱ्या पाण्याचा हिशोब ठेवण्यात आला. हॉटेल्स, मॉल्सबरोबरच हॉस्पिटल्समध्येही जलसाक्षरतेसंदर्भात जनजागरण करण्यात आले. पोस्टर्स, स्टॅण्डीच्या माध्यमातून पाणी बचतीसाठीची जागृती प्रभावीपणे झाली. अभियानाच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात शहरांमधील हौसिंग सोसायट्यांमध्ये जलपुनर्भरणाचा संदेश देण्यात आला. यासाठी जलमित्र टीम प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन जनजागरण करीत होती. रहिवाशांनी या मोहिमेला उत्तम प्रतिसाद दिला. राज्यातील ९२४ सोसायट्यांमध्ये दोन आठवडे दररोज पुनर्भरणाचे महत्त्व पटवून दिले जात होते. ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले.
>लक्षवेधी
न्यू यॉर्कमधील सुप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर येथे न्यू यॉर्क मराठी मंडळ व छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने जलमित्र अभियानाचे पोस्टर्स झळकविले.
जनजागरण अभियानात मराठी व हिंदी सिनेकलावंत, क्रीडापटू, प्रमुख
राज्यक ीय नेत्यांकडून पाणीबचतीचे संदेश.
सर्वच जिल्ह्यांमध्ये युवक संघटनांनी पाणीबचतीसाठी विविध उपक्रम राबवून या अभियानात सहभाग नोंदविला.
महिला व कुटुंबातील सदस्यांनी पाणी बचत करून त्याचा पुनर्वापर केला.

Web Title: Recycling of 50 lakh liters of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.