रेडअलर्ट! येत्या ४८ तासांत मुंबई, ठाणेसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 09:22 PM2020-09-21T21:22:06+5:302020-09-21T21:29:20+5:30

मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट

Red alert in Mumbai, Thane and Konkan! Warning of heavy rains in Pune, Kolhapur, Satara Ghat area | रेडअलर्ट! येत्या ४८ तासांत मुंबई, ठाणेसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा

रेडअलर्ट! येत्या ४८ तासांत मुंबई, ठाणेसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देबंगालच्या उपसागरात ओडिशाजवळ रविवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात सर्वत्र मॉन्सून पुन्हा सक्रीय झाला असून पुढील ४८ तास मुंबई, ठाणेसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये रेडअलर्ट देण्यात आला असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मंगळवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 
        बंगालच्या उपसागरात ओडिशाजवळ रविवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.त्याचवेळी केरळ ते कोकण किनारपट्टी दरम्यान द्रोणीय स्थिती निर्माण होऊन राज्यात मॉन्सून सक्रीय झाला आहे. याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, उत्तर महाराष्ट्रावर उंच हवेत चक्रवाताची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात मॉन्सून सक्रीय झाला आहे. पुढील ४८ तास कोकण, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.


        मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला असून घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही औरंगाबाद येथे मुसळधार पावसाची शक्यता असून सर्वदूर पावसाची शक्यता आहे. विदर्भातही अनेक मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ २३ सप्टेंबरपर्यंत हा पाऊस राहणार असून २४ सप्टेंबरपासून पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
़़़़़़़़
२२ सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता़ जळगाव, नाशिक, सांगलीत जोरदार पावसाची शक्यता, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा
२३ सप्टेंबर कोकणातील सर्व जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता़

Web Title: Red alert in Mumbai, Thane and Konkan! Warning of heavy rains in Pune, Kolhapur, Satara Ghat area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.