लाल परी झाली हायटेक

By Admin | Published: July 4, 2016 09:29 PM2016-07-04T21:29:27+5:302016-07-04T21:29:27+5:30

साधी बस (लाल) म्हटली की, खिळखिळी बस आणि आदळआपट करीत होणारा प्रवास, असे चित्र नजरेसमोर येते; परंतु महामंडळाने आता खाजगी वाहतूकदारांशी स्पर्धा करताना

The red fairy appeared Hi-tech | लाल परी झाली हायटेक

लाल परी झाली हायटेक

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. ४  : साधी बस (लाल) म्हटली की, खिळखिळी बस आणि आदळआपट करीत होणारा प्रवास, असे चित्र नजरेसमोर येते; परंतु महामंडळाने आता खाजगी वाहतूकदारांशी स्पर्धा करताना ही ओळख पुसली आहे. साधी लाल बसही आरामदायक आसन व्यवस्था, मोबाईल चार्जिंगसह अत्याधुनिक सुविधांनी सज्ज झाली आहे. त्यामुळे लाल परी हायटेक झाली आहे.
केंद्र शासनाने लागू केलेल्या ह्यएआयएस-५२ह्ण(आॅटोमोबाईल इंडियन स्टँडर्ड-५२) या नियमानुसार खाजगी आणि शासकीय बसची बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे देशभरातील सर्व बसेसची बांधणी एकसारखी राहण्यास मदत होत आहे. राज्यात दापोली, नागपूर आणि औरंगाबादेत चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत नव्या बसगाड्यांची बांधणी करण्यात येते. चिकलठाणा कार्यशाळेत या नव्या नियमानुसार लाल म्हणजे साधी बसची बांधणी सुरू करण्यात आली. नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. त्यामुळे बसची बांधणी अधिक मजबूत होत आहे. त्यामुळे यापूर्वीच्या बसगाड्यांच्या तुलनेत या बसेस खिळखिळ्या होण्याचे प्रमाण कमी राहील. नव्या नियमानुसार बसेसची बांधणी करताना टपावरील कॅरिअर काढून टाकण्यात येत आहे. त्याऐवजी प्रवाशांचे सामान वाहून नेण्यासाठी खालील भागात जागा तयार करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना सामान ठेवणे सहज शक्य होत आहे, असे चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेचे व्यवस्थापक प्रकाश पाटील म्हणाले.
प्रवासादरम्यान मोबाईलची चार्जिंग कमी होण्याने अनेकदा अडचणीला सामोरे जावे लागते. परंतु आता साध्या बसमध्येही प्रवास करताना प्रवाशांना मोबाईल चार्ज करता येणार आहे. त्यासाठी खास सॉकेट बसमध्ये बसविण्यात आले आहेत. कार्यशाळेतून गेल्या काही दिवसांत अशा ३० वर अत्याधुनिक सुविधांनीयुक्त बसेस बाहेर पडल्या आहेत.
लाल बसमध्ये झालेला बदल
१. पॉवर स्टेअरिंग.
२. अ‍ॅन्टी ब्रेकिंग सिस्टीम.
३. आरामदायक आसन व्यवस्था.
४. आसन व्यवस्थेत आगप्रतिबंधक रेक्झिनचा वापर.
५. आग प्रतिबंधक सिलिंडर (एकूण -२)
६. चालकांसाठी आरामदायक आसन.
६. पर्स ठेवण्यासाठी हुक.

Web Title: The red fairy appeared Hi-tech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.