लाल दिवा फिरू देणार नाही!
By Admin | Published: January 8, 2016 03:46 AM2016-01-08T03:46:18+5:302016-01-08T03:46:18+5:30
केंद्राने राज्यातील दुष्काळी भागांत शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने दिलेल्या ३१०० कोटींच्या पॅकेजमध्ये कापूस उत्पादकांचा समावेश नाही
मुंबई : केंद्राने राज्यातील दुष्काळी भागांत शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने दिलेल्या ३१०० कोटींच्या पॅकेजमध्ये कापूस उत्पादकांचा समावेश नाही. राज्य सरकारच्या या धोरणामुळे मराठवाड्यातील कापूस उत्पादक केंद्राच्या मदतीपासून वंचित राहिला तर लाल दिव्याच्या गाड्यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी दिला आहे.
मराठवाड्यात ८० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी कापसाचे पीक घेतात. ८ हजार ३२५ गावांत ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असताना या शेतकऱ्यांना मदतीपासून वगळले तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. बीडमधील शेतकऱ्यांनी शासन निर्णयाच्या प्रतींची होळी करून सरकारच्या निषेध केल्याचे त्यांनी सांगितले.