रेड्डीवरून सेनेचा हल्लाबोल
By admin | Published: May 21, 2016 03:58 AM2016-05-21T03:58:28+5:302016-05-21T03:58:28+5:30
लाच प्रकरणात अडकलेल्या नगररचना संचालक वाय. एस. रेड्डी यांना भेट देणाऱ्या आयुक्तांविरोधात शिवसैनिकांनी वसई विरार पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली
विरार : लाच प्रकरणात अडकलेल्या नगररचना संचालक वाय. एस. रेड्डी यांना भेट देणाऱ्या आयुक्तांविरोधात शिवसैनिकांनी वसई विरार पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. रेड्डी यांच्यावर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
महापालिकेचे नगररचनाकार वाय. शिवा रेड्डी यांनी शिवसेनेचे गटनेते धनंजय गावडेयांना लाच देण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामीनावर मुक्त झाल्यानंतर रेड्डी आयुक्त सतीश लोखंडे यांना भेटण्यासाठी गेले होते. लोखंडे यांनीही तमा न बाळगता त्यांची भेट घेतली. एरवी नागरिकांना आठवड्यातून एकदा भेटणारे लोखंडे यांनी भ्रष्टाचारी रेड्डी यांची लगेचच भेट घेतली. ही बातमी शिवसैनिकांना कळल्यावर शिवसैनिकांनी मुख्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी गाढवाची वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली होती.
या आंदोलनात तालुकाप्रमुख निलेश तेंडोलकर, जिल्हा उपप्रमुख नवीन दुबे, विरार शहरप्रमुख दिलीप पिंपळे, किरण पाटील, संजय राऊत,प्रदीप पाटील,भगवान वझे, ज्योती पवार,सुनयना साळुंखे,स्वाती वर्तक यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. फादर मायकलजी यांनीही या आंदोलनाला पाठींबा देवून शिवसैनिकांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)
> रेड्डी यांना भेटून कारणनसताना आयुक्त लोखंय्ऋे यांनी त्यांची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले.त्यामुळे आंदोलन करण्यात आले. रेड्डी यांच्याविरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून आयुक्त त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप धनंजय गावय्ऋे यांनी यावेळी बोलताना केला.
आयुक्तांनी वाय. एस. रेड्डीची भेट घेतल्याने नाराज शिवसेनिकांनी महानगरपालिका मुख्यालया समोरील रस्ता अक्षरश: बंद पाडला होता.
या भेटीचा निषेध करुन जाब विचारण्यासाठी काढलेल्या मोर्चामध्ये गाढवावर निषेधाचे होर्डिंग्स लावून अनोख्या पद्धतीने आपला विरोध प्रदर्शित केला.