समृद्धी महामार्गात जमीन जाणा-या शेतक-यांना रेडीरेकनरचे गाजर
By Admin | Published: April 4, 2017 03:58 PM2017-04-04T15:58:42+5:302017-04-04T15:58:42+5:30
अमरावती विभागात रेडीरेकनरची ६.३० टक्के दरवाढ: सात वर्षातील सर्वात कमी दरवाढ.
बुलडाणा : समृद्धी महामार्गातील जमीनी १ एप्रिलनंतर खरेदी केल्यास रेडीरेकनरच्या दरात चांगली वाढ होऊन शेतक-यांचा फायदा होईल या आशेवर शेतकरी होते. मात्र अमरावती विभागात सात वर्षात झालेल्या दरवाढीमध्ये पहिल्यांदाच सर्वात कमी म्हणजे केवळ ६.३० टक्के रेडीरेकनरची दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतक-यांना आतापर्यंत रेडीरेकनरची चांगली दरवाढ मिळेल याचे गाजरच दाखवले गेले.