अंतर कमी अन् खर्चही अल्प !
By admin | Published: April 21, 2016 03:19 AM2016-04-21T03:19:15+5:302016-04-21T03:19:15+5:30
लातूर - मिरज हे रेल्वेचे अंतर जवळपास ३६४ कि़मी़ आहे़ जालना जिल्ह्यातील सातोना ते लातूरचे २१७ कि़मी़चे अंतर आहे़ मिरजच्या तुलनेत हे अंतर कमी आहे़ रेल्वे प्रशासन राज्य
सेलू (जि. परभणी) : लातूर - मिरज हे रेल्वेचे अंतर जवळपास ३६४ कि़मी़ आहे़ जालना जिल्ह्यातील सातोना ते लातूरचे २१७ कि़मी़चे अंतर आहे़ मिरजच्या तुलनेत हे अंतर कमी आहे़ रेल्वे प्रशासन राज्य शासनाकडून पाणीपुरवठ्यासाठी पैसा घेणार नसले तरी यासाठी लागणारा खर्च कमी होणार आहे़ त्यामुळे लातूरकरांसाठी दुधनाचे पाणी परवडणारे आहे.
दूधना प्रकल्पाची एकूण क्षमता ३४४़८० दलघमी असून, सद्यस्थितीत धरणात एकूण १४३ दलघमी म्हणजेच ४१ टक्के साठा आहे़ धरणात १६ टक्के उपयुक्त साठा आहे़ या धरणातून सेलू, परतूर या दोन शहरांना तसेच आठ गाव पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा होतो़
जालना जिल्हाधिकारीही
पाहणी करणार
दूधनातून पाणी देण्यास काहीही हरकत नाही़ जेथून पाणी देण्यासाठी सोपे जाईल ते सातोना हे ठिकाण जालना जिल्ह्यात येते़ त्यामुळे तेथील जिल्हाधिकारीही या संदर्भात पाहणी करणार आहेत़ याबाबत वरिष्ठांना अहवाल देऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी ‘लोकमत’ला दिली़ (प्रतिनिधी)
> अहवाल शासनाला पाठविणार - लोणीकर
४जालना : लातूर शहरासाठी सध्या मिरज येथून रेल्वेने पाणी आणले जात आहे. पण त्यास विलंब होत असल्याने निम्न दुधनातून या शहराला रेल्वेने पाणी पाठविण्याबाबत गत एक महिन्यापासून विविध पातळ्यांवर विचार सुरू होता.
४याची व्यवहार्यता तपासली असून, याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी पत्र परिषदेत दिली. यासंदर्भात एक महिन्यापासून जिल्हाधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी व आपण बारकाईने अभ्यास केला. व्यवहार्यता तपासल्याचे लोणीकर म्हणाले.
४सध्या लातूर शहराला मिरज येथून रेल्वेने पाणी आणले जात आहे. त्यापेक्षा हे अंतर कमी आहे. विशेष म्हणजे परतूर रेल्वेस्थानकाजवळ जलकुंभ उभारलेला असल्याने यासाठी अधिकचा खर्चही येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.