मद्यप्रेमींवर ठाकरे सरकारची कृपादृष्टी; विदेशी दारू झाली स्वस्त, दर अर्ध्यापर्यंत घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 08:11 AM2021-12-11T08:11:30+5:302021-12-11T08:12:33+5:30

काही रुपयांसाठी अशी अन्य राज्यांतून ने-आण करण्याची लोकांना गरज पडणार नाही. तरीदेखील कोणी तशी ने- आण केली, तर त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे

Reduced the rate of special duty on imported liquor in Maharashtra, Know About New rate | मद्यप्रेमींवर ठाकरे सरकारची कृपादृष्टी; विदेशी दारू झाली स्वस्त, दर अर्ध्यापर्यंत घटले

मद्यप्रेमींवर ठाकरे सरकारची कृपादृष्टी; विदेशी दारू झाली स्वस्त, दर अर्ध्यापर्यंत घटले

googlenewsNext

मुंबई : परदेशातून आयात केलेल्या मद्यावरील विशेष शुल्काचा दर राज्य सरकारने १८ नोव्हेंबरपासून ३०० टक्क्यांवरून १५० टक्के केला होता. त्यानुसार, दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून दारूचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले आहेत.

काही रुपयांसाठी अशी अन्य राज्यांतून ने-आण करण्याची लोकांना गरज पडणार नाही. तरीदेखील कोणी तशी ने- आण केली, तर त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तूर्तास, आठ प्रकारच्या दारूचे दर निश्चित करण्यात आले असून, लवकरच इतर कंपन्यांच्या दारूचेही अशाच प्रकारे दर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

विशेष शुल्क कमी करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील परदेशातून आयात मद्याचे दर कमी होऊन इतर राज्यांच्या बरोबरीत आले आहेत. दर कमी झाल्यामुळे आता तस्करीला आळा बसेल. शिवाय बनावट मद्य आणि चोरीचे प्रकार कमी होतील, असा दावा केला जात आहे. 

जॉनी वॉकर ब्लॅक लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की - जुना दर - ५७६० तर नवीन दर - ३७५० रुपये

जॉनी वॉकर रेड लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की - जुना दर - ३०६० तर नवीन दर - १९५० रुपये

जे ॲण्ड बी रेअर ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की - जुना दर - ३०६० तर नवीन दर २१०० रुपये

जेम्सन ट्रिपल डिस्टल्ड आयरिश व्हिस्की -जुना दर - ३८०० तर नवीन दर २५०० रुपये

ब्लॅन्टाइन्स फाइनेस्ट ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की - जुना दर -३०७५ तर नवीन दर - २१०० रुपये

शिवास रिगल (१२ वर्षे जुनी) ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की - जुना दर ५८५० तर नवीन दर ३८५० रुपये

जॉर्डन्स लंडन ड्राय जीन - जुना दर २४०० तर नवीन दर १६५० रुपये

 

 

Read in English

Web Title: Reduced the rate of special duty on imported liquor in Maharashtra, Know About New rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.