महामार्गावरील मृत्यूचे प्रमाण कमी करणे प्राथमिकता - नितिन गडकरी

By admin | Published: September 13, 2016 01:08 PM2016-09-13T13:08:03+5:302016-09-13T17:01:16+5:30

महामार्गावर अपघाताची ठिकाणं शोधून त्याठिकाणी क्रॅश बॅरिअर सोलार लाईटचा वापर करुन स्पीड ब्रेकर्स तयार करण्यात येतील अशी माहिती नितिन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना दिली आहे

Reduction of death rate on priority road - Nitin Gadkari | महामार्गावरील मृत्यूचे प्रमाण कमी करणे प्राथमिकता - नितिन गडकरी

महामार्गावरील मृत्यूचे प्रमाण कमी करणे प्राथमिकता - नितिन गडकरी

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - लोकांचं आयुष्य ही आमची प्राथमिकता आहे. महामार्गावर अपघाताची ठिकाणं शोधून त्याठिकाणी क्रॅश बॅरिअर सोलार लाईटचा वापर करुन स्पीड ब्रेकर्स तयार करण्यात येतील, यामुळे अपघात आणि मृत्यूचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी होईल अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना दिली आहे. सोबतच अपघाताचा आकडा सांगताना महामार्गावर 5 लाख अपघात झाले असून 1.5 लाख लोकांचा मृत्यू आणि 2.5 लाख लोक जखमी झाले आहेत असंही गडकरींनी सांगितलं आहे. 
 
आपण पैसे किंवा इतर गोष्टींमध्ये कमी पडत नाही आहोत. मात्र आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे. सर्व प्रक्रिया कायेदशीर झाल्या पाहिजेत असा आदेश देण्यात आला आहे. टॉयलेट पेपरसाठीही आम्ही टेंडर काढत आहोत मात्र त्याचवेळी वेळेची मर्यादाही पाळत आहोत  प्रलंबित राहणं टाळा हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील महत्वाकांक्षी प्रकल्पांना लवकरात लवकर पुर्ण करण्यात आग्रही आहेत असं नितिन गडकरी बोलले आहेत. 
 
1 जानेवारीपासून बडोदा - मुंबई हायवेच्या कामाला सुरुवात -
1 जानेवारीपासून 40 हजार कोटींच्या बडोदा - मुंबई हायवेच्या कामाला सुरुवात होईल. मुंबई - गोवा हायवे प्राथमिकता असून 2018 च्या आधी चार लेन सुरु करण्यात येतील. चार महिन्यांमध्ये 10 हजार कोटींच्या कामांचे आदेश जारी करण्यात येतील. तसंच 10 हजार कोटी खर्च करुन पंढरपूर वारीच्या रस्त्याचा विकास करण्यात येणार असल्याची माहितीही नितिन गडकरी यांनी दिली आहे.
 
बसपोर्ट उभे करण्यासाठी राज्यांनी जमीन देण्याची गरज - 
पर्यावरणाबद्दल पुर्णपणे जागरुक असून एकही झाड कापायला न लागावं यासाठी प्रयत्न करत आहोत. ग्रीन हायवे तयार करण्यात येणार असून यामुळे प्रदूषण कमी होईल. गुजरातमध्ये एअरपोर्टप्रमाणे बसपोर्ट उभारण्यात येणार आहेत. बसपोर्ट उभे करण्यासाठी राज्यांनी आम्हाला जास्तीत जास्त जमीन देणं गरजेचं आहे कारण आम्हाला त्याची गरज आहे. महाराष्ट्रामधील रस्त्यांचं जाळं 2.5 ते 3 लाख किमीपर्यंत पसरवण्यात येईल असंही नितिन गडकरी यांनी सांगितलं आहे. 
 
बंदरांची हाताळणी करण्यामध्ये गुजरातमधील अदानीपेक्षा महाराष्ट्राची कार्यक्षमता जास्त आहे. पनवेल ते जेएनपीटीसाठी 8 लेन बनवण्याचा प्रस्ताव आहे.  जलमार्ग, रेल्वे आणि त्यानंतर रस्ते हा आमच्या प्राथमिकतेचा क्रम असल्याचं नितिन गडकरींनी यानिमित्ताने स्पष्ट केलं. 
 
दिल्लीपेक्षा माल मुंबईहून लंडनला पाठवणं जास्त सोपं - 
मालदिवमध्ये 47 समुद्र जहाज वाहतुकीचे रस्ते असताना आपल्याकडे एकही नाही. आपल्याकडे 13 हजार बेटे आहेत ज्यांचा अजिबात वापर होत नाही. जलवाहतूकीसाठी 20 हजार किमी जलमार्ग आणि 7.5 हजार किमी समुद्रकिनारा असताना आपण काहीतरी करण्यापेक्षा फक्त चर्चात करतो अशी खंत गडकरींनी बोलून दाखवली. माल मुंबईहून लंडनला पाठवणं हे मुंबईहून दिल्लीला पाठवण्यापेक्षा जास्त सोपं आहे. हे बदलण्याची गरज असल्याचं मत गडकरींनी व्यक्त केलं.
 
आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डच्या स्वस्त कार भारतात तयार करणार - 
कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी मनमाड ते इंदोर मुख्य रेल्वे मालवाहतूकमार्ग असेल. सोबतच आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डच्या स्वस्त कार भारतात तयार केल्या जातील अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली.
काही पर्यावरणवादी सतत विकासाच्या कामांना विरोध करत असतात. वांद्रे - वरळी सी लिंकचं बांधकाम सुरु असताना हा अनुभव आला. फक्त 7 लोकांनी एकूण 125 याचिका दाखल केल्या होत्या असं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.  मुंबईतील समुद्रकिना-यांवर घाण वास येत असतो. कचरा समुद्रकिना-यात टाकण्यापासून आपण रोखू शकत नाही का ? कच-यासोबत प्लास्टिकचाही निचरा केला जाऊ शकतो. आपण तो करणे गरजेचे आहे असं आवाहन नितिन गडकरी यांनी यावेळी केलं.
 
मी दिल्लीत बसलेलो महाराष्ट्राचा अॅम्बेसिडर -
विकासाचा सर्वात जास्त फायदा कृषी उद्योगाला होईल. मुंबई आणि महाराष्ट्रात प्रचंड क्षमता आहे. दोघेही देशाच्या विकासाची इंजिन आहे. मी दिल्लीत बसलेलो महाराष्ट्राचा अॅम्बेसिडर आहे असं नितिन गडकरी बोलले आहेत.
 

Web Title: Reduction of death rate on priority road - Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.