भारतात नवनिर्मितीची कमतरता - जावडेकर

By admin | Published: January 5, 2015 06:36 AM2015-01-05T06:36:33+5:302015-01-05T06:36:33+5:30

आपल्याकडील शिक्षण व्यवस्थेमुळे भारतात नवनिर्मितीची कमतरता असून, यासंदर्भातील संस्कृती रुजवणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय पर्यावरण,

Reduction in India - Javadekar | भारतात नवनिर्मितीची कमतरता - जावडेकर

भारतात नवनिर्मितीची कमतरता - जावडेकर

Next

मुंबई : आपल्याकडील शिक्षण व्यवस्थेमुळे भारतात नवनिर्मितीची कमतरता असून, यासंदर्भातील संस्कृती रुजवणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदलमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. मुंबईत आयोजित १०२व्या भारतीय विज्ञान परिषदेतील ‘संस्कृतच्या माध्यमातून प्राचीन भारतीय विज्ञान’ या चर्चासत्रात प्रकाश जावडेकर रविवारी बोलत होते.
प्रकाश जावडेकर म्हणाले, कुठलेही पुरेसे साधन, यंत्र नसताना केवळ सूक्ष्म निरीक्षण, वैचारिकता, अनुभव, बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र यांच्या आधारावर प्राचीन भारतीय विज्ञानाने जे साध्य केले त्या ज्ञानाची दखल घेऊन त्याच्या संदर्भाचा उपयोग केला गेला पाहिजे. जर्मनीसारखा देश जर आपली संस्कृत भाषा आणि प्राचीन भारतीय विज्ञानाच्या आधारावर नवी उपकरणे, नवे विज्ञान विकसित करीत असेल तर आपण का करू नये, असा सवाल जावडेकर यांनी या वेळी केला. प्रत्येक जुनी गोष्ट जशी सोने नसते तशीच प्रत्येक जुनी गोष्ट टाकाऊसुद्धा नसते, असे त्यांनी नमूद केले. देशातील युवा वर्गात क्षमता आहे, उत्साह आहे, काहीतरी करून दाखविण्याची धमक आहे; याच आधारावर विज्ञानाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होतो, असे त्यांनी नमूद केले. कार्यालयात किती वेळ काम केले यावरून वैज्ञानिक छोटा किंवा मोठा नसतो तर त्याच्यातील उपजत बुद्धिमत्तेच्या जोरावर तो मोठा होत असतो आणि तेव्हाच विज्ञानाचा विकास होतो. निसर्गाच्या नियमाबद्दल सांगताना जावडेकर म्हणाले की, ज्ञान ही प्रगतीशील प्रक्रिया असून, सर्व मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे, त्या विचारात घेणे आवश्यक आहे, त्यानंतर यातील चांगल्या गोष्टी कायम राहतील तर चुकीच्या गोष्टी नष्ट होतील.
दरम्यान, या चर्चासत्राला भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. निमसे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य, मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या प्रमुख गौरी माहुलीकर आणि
ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Reduction in India - Javadekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.