दुष्काळ निवारणासाठी निविदा कालावधीत कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 04:41 AM2018-12-12T04:41:26+5:302018-12-12T04:41:44+5:30

राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे निवारण करण्यासाठी टंचाईच्या कालावधीतच संबंधित कामे पूर्ण व्हावीत यासाठी निविदांचा कालावधी कमी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतला असून त्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Reduction in tender period for drought relief | दुष्काळ निवारणासाठी निविदा कालावधीत कपात

दुष्काळ निवारणासाठी निविदा कालावधीत कपात

Next

मुंबई : राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे निवारण करण्यासाठी टंचाईच्या कालावधीतच संबंधित कामे पूर्ण व्हावीत यासाठी निविदांचा कालावधी कमी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतला असून त्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पाच लाख रुपयांपेक्षा कमी कामासाठीच्या निविदांचा कालावधी आठ दिवसांवरुन पाच दिवस तसेच पाच ते ५० लाख रुपयांपर्यंतच्या किंमतीच्या कामासाठीच्या निविदांचा कालावधी १५ दिवसांवरुन सात दिवस तसेच ५० लाखांपेक्षा अधिक किंमतीच्या कामासाठीच्या निविदांचा कालावधी २५ दिवसांवरुन १० दिवस इतका कमी करण्यात आला आहे.

कृषी विद्यापीठ कुलगुरु निवडीतील विलंब टाळणार
कृषि विद्यापीठांच्या कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब टाळण्यास महाराष्ट्र कृषि विद्यापीठे अधिनियमात बदल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. त्यानुसार भारतीय कृषि संशोधन परिषदेचे महासंचालक किंवा त्यांच्याऐवजी त्यांनी नामनिर्देशित केलेल्या सदस्यांचा समावेश कुलगुरु शोध समितीमध्ये करता येणार आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. भट्टाचार्य यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त पदावर तातडीने नेमणुकीसाठी शोध समितीची स्थापना आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Reduction in tender period for drought relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.