‘माझ्या पतीची हत्या त्याच्या वडिलांनी नव्हे तर…’ त्या रीलस्टारच्या पत्नीने केला धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 20:35 IST2025-02-28T20:35:28+5:302025-02-28T20:35:54+5:30

Reel Star Vickey Patil Murder Update: जळगावमधील एक प्रसिद्ध रील स्टार असलेल्या विकी पाटील याच्या हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Reel Star Vickey Patil Murder Update: 'My husband was killed not by his father but...' the reelstar Vickey Patil's wife made a shocking claim | ‘माझ्या पतीची हत्या त्याच्या वडिलांनी नव्हे तर…’ त्या रीलस्टारच्या पत्नीने केला धक्कादायक दावा

‘माझ्या पतीची हत्या त्याच्या वडिलांनी नव्हे तर…’ त्या रीलस्टारच्या पत्नीने केला धक्कादायक दावा

Reel Star Vickey Patil Murder Update: जळगावमधील एक प्रसिद्ध रील स्टार असलेल्या विकी पाटील याच्या हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विकी पाटील याची त्याच्या वडिलांनी हत्या करून नंतर त्यांनीही जीवन संपल्याचं समोर आलं होतं. तसेच विकीकडून होणारी मारहाण आणि छळाला कंटाळून त्याची हत्या केल्याची चिठ्ठी लिहून त्यांच्या खिशात सापडली होती. मात्र आता मयत विकी पाटील याची पत्नी पायल पाटील हिने वेगळाच दावा केला आहे.

विकी पाटील याची हत्या त्याच्या वडिलांनी नव्हे तर काकांनी केली, असा दावा विकीच्या पत्नीने केला आहे. माझ्या सासऱ्यांना साधी त्यांच्या शर्टाची बटणंही लावता येत नव्हती, त्यामुळे ते माझ्या पतीची हत्या करणं शक्य नाही, असे तिने म्हटले आहे. त्यामुळे रीलस्टार विकी पाटीलच्या हत्याकांड प्रकरणात नवा गुंता निर्माण झाला आहे. 

मात्र विकीच्या आईने मात्र तिच्या पतीनेच विकीची हत्या करून नंतर आपलं जीवन संपवल्याचा दावा केला आहे. विकी हा मद्यपान करायचा, आपल्याचा जुमानायचा नाही, तसेच मारहाणही करायचा, त्यामुळे वैतागलेल्या वडिलांनी त्याची हत्या केली, असे विकीच्या आईने म्हटले आहे.

दरम्यान, विकी पाटील याची हत्या केल्यानंतर माजी सैनिक असलेल्या त्याच्या वडिलांनी स्वत:ही जीवन संपवलं होतं. त्यांच्याा खिशामधून एक चिठ्ठी सापडली होती. त्यात त्यांनी हितेश हा दारू पिऊन आपणास मारहाण करत होता. त्यामुळे भवरखेडा गावानजीकच्या एका नाल्याजवळ आपण त्याचा खून केला व मृतदेह जमिनीत पुरला आहे, असं लिहिलं होतं.  दरम्यान, आता या हत्याकांडात वेगवेगळे दावे समोर आल्याने प्रकरणाती गुंता सोडवून सत्य समोर आणण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे.  

Web Title: Reel Star Vickey Patil Murder Update: 'My husband was killed not by his father but...' the reelstar Vickey Patil's wife made a shocking claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.