मिहानमध्ये वीजपुरवठ्यासाठी फेरनिविदा

By Admin | Published: February 4, 2015 12:54 AM2015-02-04T00:54:04+5:302015-02-04T00:54:04+5:30

मागणीच्या आधारे वीज एक्स्चेंजमधून दररोजची वीज खरेदीची कटकट नेहमीसाठी थांबविण्यासाठी काढण्यात आलेली वीज निश्चितीची निविदा एकच वीज निर्मिती कंपनीने भरल्याने सध्या ही

Refund for power supply in Mihan | मिहानमध्ये वीजपुरवठ्यासाठी फेरनिविदा

मिहानमध्ये वीजपुरवठ्यासाठी फेरनिविदा

googlenewsNext

नागपूर : मागणीच्या आधारे वीज एक्स्चेंजमधून दररोजची वीज खरेदीची कटकट नेहमीसाठी थांबविण्यासाठी काढण्यात आलेली वीज निश्चितीची निविदा एकच वीज निर्मिती कंपनीने भरल्याने सध्या ही प्रक्रिया अयशस्वी ठरली आहे. ही प्रक्रिया मुंबईत पार पडली.
मिहानमधील उद्योगांना घोषणेपेक्षा जास्त दराची वीज घ्यावी लागत असल्याची ओरड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत उद्योगांना प्रति युनिट ४.३९ रुपये दराने वीज उपलब्ध करून दिली. पण वीज उपलब्ध करून देण्यासाठी एमएडीसीला जास्त कसरत करावी लागत आहे. सध्या १४ ते १५ कंपन्यांकडून दररोज ६ ते ७ मेगावॅट विजेची मागणी असते. ही मागणी ३ मेगावॅटपासून सुरू होते. एमएडीसीला दररोज सकाळी ६ ते सायंकाळी ६, सायंकाळी ६ ते रात्री १० आणि रात्री १० ते सकाळी ६ अशा वेळात उद्योगांना किती वीज लागते, याचा लेखाजोखा पॉवर एक्स्चेंजला द्यावा लागते. यासाठी एमएडीसीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चमू कार्यरत आहे. पॉवर एक्स्चेंजची भानगड नको आणि उद्योगांना थेट वीज मिळावी म्हणून वीजनिर्मिती कंपन्यांकडून निविदा मागविल्या होता. यामुळे कंपन्यांना रोज किती वीज लागते, तेवढीच वीज या वीज निर्मितीदारांकडून मिळणार होती आणि एमएडीसीची नेहमीची कटकट दूर होणार होती. पण २७ जानेवारीपर्यंत एकाच वीज निर्मिती कंपनीने निविदा भरल्याने फेरनिविदा काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. विजेचा पुरवठा कमी असल्याने वीज निर्मिती कंपन्यांनी निविदेकडे पाठ फिरविल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Refund for power supply in Mihan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.