शहांना आरोपमुक्त न करण्याचा मध्यस्थी अर्ज फेटाळला
By admin | Published: October 22, 2015 02:22 AM2015-10-22T02:22:02+5:302015-10-22T02:22:02+5:30
सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची आरोपातून मुक्तता करण्यात येऊ नये. उच्च न्यायालयाने स्वत:हूनच या प्रकरणी दखल घ्यावी, अशी मागणी
मुंबई: सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची आरोपातून मुक्तता करण्यात येऊ नये. उच्च न्यायालयाने स्वत:हूनच या प्रकरणी दखल घ्यावी, अशी मागणी करणारा मध्यस्थी अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला.
सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी ट्रायल कोर्टाने अमित शहा यांची सर्व आरोपांतून सुटका केली. या निर्णयाला सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. या अपिलावरील सुनावणी न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती. मात्र, अचानकपणे रुबाउद्दीन यांनी आपण अपिल मागे घेत असल्याची माहिती न्या. प्रभुदेसाई यांना दिली. उच्च न्यायालयाने स्वत:हून याची दखल घेऊन शहा यांच्याविरोधातील अपिलावर सुनावणी घ्यावी, अशी मागणी राजेश कांबळेंनी मध्यस्थी अर्जाद्वारे केली. कांबळे यांचे नुकसान झाले नसल्यामुळे त्यांना अर्ज दाखल करण्याचा अधिकार नाही, असे म्हणत न्या. प्रभुदेसाई यांनी कांबळे यांचा मध्यस्थी अर्ज फेटाळला.