भारत-पाक अंतिम सामना "फिक्स" असल्याची शंका, चौकशी व्हावी: रामदास आठवले

By admin | Published: July 2, 2017 08:11 AM2017-07-02T08:11:05+5:302017-07-02T08:15:36+5:30

उलट-सुलट विधानं करुन नेहमीच चर्चेत राहणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विधान केलं आहे.

Regarding the Indo-Pak final match "fix", should be inquired: Ramdas Athavale | भारत-पाक अंतिम सामना "फिक्स" असल्याची शंका, चौकशी व्हावी: रामदास आठवले

भारत-पाक अंतिम सामना "फिक्स" असल्याची शंका, चौकशी व्हावी: रामदास आठवले

Next
>
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 2 - उलट-सुलट विधानं करुन नेहमीच चर्चेत राहणारे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विधान केलं आहे.  नुकत्याच झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाककडून भारताचा दारुण पराभव झाला. भारताचा इतक्या लाजिरवाण्या पद्धतीने पराभव होणे, हे संशयास्पद आहे. तो सामना ‘फिक्स’ तर नव्हता ना? अशी शंका येते. त्यामुळे त्या सामन्याची सखोल चौकशी व्हावी, असं आठवले म्हणाले. शनिवारी एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता रविभवनात ते पत्रकारांशी बोलत होते. 
 
यावेळी बोलताना क्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये अनुसूचित जाती व जमातीच्या खेळाडूंना २५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणीही आठवलेंनी केली.  चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याविषयी बोलताना, साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यात भारताने पाकचा एकतर्फी पराभव केला होता. असे असताना अंतिम सामन्यात भारताचा इतक्या लाजिरवाण्या पद्धतीने पराभव होणे, हे संशयास्पद आहे. तो सामना ‘फिक्स’ तर नव्हता ना? अशी शंका येते. त्यामुळे त्या सामन्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली.  
 
तसेच शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करताना विविध मागासवर्गीय महामंडळातील कर्जही माफ करण्यात यावे, याचा पुनरुच्चार आठवले यांनी केला. याशिवाय स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर रिपाइंची भूमिका स्पष्ट असून, येत्या २५ ऑगस्टपासून आंदोलन सुरू केले जाईल, असेही रामदास आठवले यांनी सांगितले. गोरक्षकांचा जो हैदोस सुरू आहे, त्याचा निषेध करीत गोवंश हत्या या शब्दातून ‘वंश’ हा शब्द काढण्यात यावा, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गोहत्येला प्रतिबंध करणाऱ्या जुन्याच कायद्याची अंमलबजावणी व्हावी, असेही ते म्हणाले.
 
 

Web Title: Regarding the Indo-Pak final match "fix", should be inquired: Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.