उपनिबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

By Admin | Published: January 1, 2016 12:24 AM2016-01-01T00:24:23+5:302016-01-01T00:24:23+5:30

राज्यातील उपनिबंधक दर्जाच्या १७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून नव्याने सेवेत दाखल झालेल्या १७ जणांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

Regarding transfers of registrar officers | उपनिबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

उपनिबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

googlenewsNext

सोलापूर : राज्यातील उपनिबंधक दर्जाच्या १७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून नव्याने सेवेत दाखल झालेल्या १७ जणांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
राज्यातील उपनिबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये सोलापूर शहर निबंधक बी. एस. कटरे यांची बदली सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन सोलापूर येथे झाली आहे. त्यांच्या जागी अहमदनगर येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रियंका माधव गाडीलकर यांची नियुक्ती झाली आहे.

यांची झाली बदली
शुभांगी गौड (बीड ते उपव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, लातूर), गौ.शं. कांबळे (एल. विभाग मुंबई ते यवतमाळ), ए.एन. कुंभार (आर दक्षिण विभाग मुंबई ते ठाणे शहर), बी.एम. जाधव (वसई ते उपसचिव मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई), जी.जी. बलसाने (मालेगाव ते नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन), आर.एस. धोंडकर (डी. विभाग मुंबई ते उपसचिव मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती), आर. जी. गायकवाड (डोंबिवली ते पदस्थापना नाही), ए.एस. गार्डी (जळगांव ते उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे), जी.जी. मावळे (नाशिक ते अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन), बी.एस. कटरे (सोलापूर शहर ते सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन), एम.यु. राठोड (अमरावती ते उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ अमरावती), एम.बी.सांगळे (कल्याण ते प्रशासकीय अधिकारी, प्रोजेक्ट को-आॅर्डिनेशन पुणे), एस.एम. तांबे (एन. विभाग मुंबई ते कृषी पणन मंडळ तळेगाव दाभाडे), ए.एम. देशमुख (पुणे शहर ते पुणे), एस. टी. गुंजाळ (कराड ते उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर), एम.बी. मस्के (के. पश्चिम विभाग मुंबई ते मुंबई शहर-३), प्रताप पाटील (ठाणे शहर ते के. पश्चिम विभाग मुंबई).

नव्याने नियुक्ती दिलेले उपनिबंधक (कंसात ठिकाण)
संदीप जाधव (अमरावती तालुका), अमर शिंदे (मालेगाव तालुका), राजेंद्र पालेकर (दक्षिण विभाग मुंबई), मुकेश बारहते (डी. विभाग मुंबई), संगमेश्वर बदनाळे (जळगांव तालुका), प्रकाश जगताप (कल्याण, ठाणे), सुनील कोठावळे (ठिकाण दिले नाही), कुंदन भोळे (कराड), प्रिया शिवाजीराव दळणर (वसई), फयाज मुलाणी (नाशिक तालुका), शिरीष सपकाळ (एल.विभाग मुंबई), अनिवाश भागवत (पुणे शहर-२), नीलम ज्ञानेश्वर पिंगळे (डोंबिवली), महेंद्र चव्हाण (नागपूर शहर-३), प्रियंका माधव गाडीलकर (सोलापूर शहर), योगेश देसाई (एन.विभाग मुंबई), सतीश देवकाते (बीड तालुका)

Web Title: Regarding transfers of registrar officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.