राजसत्ता भोंदूबाबाच्या चरणी

By admin | Published: October 19, 2016 05:47 AM2016-10-19T05:47:14+5:302016-10-19T05:47:14+5:30

नरेंद्र महाराजांच्या दरबारातील मुख्यंत्र्यांची उपस्थिती म्हणजे सध्या राजसत्ता भोंदूबाबांच्या चरणी गेल्याचे निदर्शक आहे

Regency | राजसत्ता भोंदूबाबाच्या चरणी

राजसत्ता भोंदूबाबाच्या चरणी

Next


करमाळा (जि. सोलापूर) : नरेंद्र महाराजांच्या दरबारातील मुख्यंत्र्यांची उपस्थिती म्हणजे सध्या राजसत्ता भोंदूबाबांच्या चरणी गेल्याचे निदर्शक आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर मंगळवारी तोफ डागली. राज्यात गुन्हेगारी व पोलिसांवरील वाढलेले हल्ले, हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे, असेही पवार यांनी सांगितले.
येत्या नगर परिषदा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा करमाळा तालुक्यातील पक्ष पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा येथे पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार शामलताई बागल उपस्थित होत्या.
आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ६० टक्के युवक व नवीन चेहऱ्यांना तिकीट दिले जाईल. अवैध धंदेवाले, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी देऊ नका, असे स्पष्ट आदेश पक्षाचे सर्वेसर्वा श्रद पवार यांनी दिले असून, यामुळे पक्षाचा संदेश जनतेत चांगला जाईल, असे अजित पवार म्हणाले. जे पक्षाशी मागील निवडणुकीत गद्दारी करून अद्यापही पक्षाच्या पदावर आहेत अशांना जिल्हाध्यक्षांनी पदावरून काढून टाकावे, अशा सूचनाही त्यांनी या वेळी केल्या. बडतर्फीची कारणेजिथे नगरपालिकेची निवडणूक आहे तेथेच आचारसंहिता लागू करावी. महापालिका व ग्रामीण क्षेत्रात विनाकारण आचारसंहिता लागू केल्याने विकासकामांवर याचा परिणाम होणार असून, निवडणूक आयोगाने यासंबंधीचा निर्णय घ्यावा, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे. मुख्यमंत्री व मंत्री शहरात गेले की साखर, दूध, कांदा स्वस्त व्हायला पाहिजे असे सांगतात तर ग्रामीण भागात आले की ते शेतकऱ्यांच्या बाजूने उसाला, दुधाला व कांद्याला जास्तीचा भाव मिळाला पाहिजे, अशा दोन्ही बाजूने बोलतात. सत्ताधारी बनवाबनवी करून जनतेची फसवणूक करीत आहेत.
महागाई कमी करू, धनगर समाजास आरक्षण देऊ, अशी खोटी आश्वासने देऊन हे सरकार सत्तेवर आले आहे. ते आता नगर परिषद व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये घुसू पाहत असून, त्यांना वेळीच रोखा, असे आवाहनही पवार यांनी केले. (वार्ताहर)
>पूर्वी पन्नास लाखांत आमदार फुटायचे
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेकांच्या पक्षांतर्गत कोलांटउड्या सुरू आहेत. त्यावर भाष्य करताना पूर्वी ५० लाख रुपयांमध्ये आमदार फुटायचे. मात्र, आता तेवढ्या पैशात नगरसेवकदेखील फुटत नाहीत, अशी टिप्पणीही पवार यांनी केली.

Web Title: Regency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.