राज ठाकरेंच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करा!

By admin | Published: July 26, 2016 04:13 PM2016-07-26T16:13:12+5:302016-07-26T16:30:04+5:30

अ‍ॅट्रॉसिटी कायदा' रद्द करण्याची मागणी करुन राज ठाकरेंनी संविधान मान्य नसल्याचं दाखवलं आहे. त्यामुळे त्यांनी मागासवर्गीय समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. असा आरोप भारिप बहुजन महासंघाने केला आहे.

Register against Raj Thackeray as per the laws of the Atrocity Act! | राज ठाकरेंच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करा!

राज ठाकरेंच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करा!

Next

ऑलाइन लोकमत
जालना, दि. २६ : 'अ‍ॅट्रॉसिटी कायदा' रद्द करण्याची मागणी करुन राज ठाकरेंनी संविधान मान्य नसल्याचं दाखवलं आहे. त्यामुळे त्यांनी मागासवर्गीय समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. असा आरोप भारिप बहुजन महासंघाने केला आहे.


त्यामुळेच राज ठाकरेंवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी भारिपने केला आहे. तशी तक्रार भारिपने तालुका पोलिस स्टेशनमध्ये केली आहे. राज ठाकरे हे लोकशाहीविरोधी असून, त्यांना संविधान मान्य नसल्याचं दिसतंय. त्यांनी मागासवर्गीय समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळेच राज ठाकरेंवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करा. असं भारिपने तक्रारीत म्हटलं आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करायला हवा, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी काल कोपर्डीला भेट दिल्यानंतर पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं होत. बलात्कार करणा-यांसाठी शरियतसारखे कठोर कायदे लागू करून बलात्का-यांना कठोर शिक्षा केली पाहिजे असेही ते म्हणाले होते. (अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करायला हवा- राज ठाकरे)

 

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे-

-मुख्यमंत्र्यांनी सर्व पातळीवर लक्ष ठेवलं पाहिजे.

-कुणाची बलात्कार करण्याची हिंमत होऊ नये

-गुन्हेगारांना कायद्याची भीती नाही

-अ‍ॅट्रॉसिटीचा फेरविचार करणं गरजेचं

-कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच असला पाहिजे

-इतर देशांप्रमाणे भारतातही कठोर कायदे हवेत

 

Web Title: Register against Raj Thackeray as per the laws of the Atrocity Act!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.