शिवसेनेचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवा- नितेश राणे

By Admin | Published: June 15, 2017 04:29 PM2017-06-15T16:29:57+5:302017-06-15T16:29:57+5:30

काँग्रेस नेते आणि आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे नाव नोंदवण्याची मागणी केली आहे.

Register Shivsena's name in Guinness Book- Nitesh Rane | शिवसेनेचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवा- नितेश राणे

शिवसेनेचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवा- नितेश राणे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 15 -  काँग्रेस नेते आणि आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे नाव नोंदवण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारचं समर्थन परत घेणार असल्याच्या पोकळ धमक्या देणा-या शिवसेनेच्या नावे रेकॉर्ड नोंदवला गेला पाहिजे, असं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला चिठ्ठी लिहून नितेश राणेंनी कळवलं आहे.

नितेश राणे म्हणाले, मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून एक रेकॉर्ड रजिस्टर करू इच्छितो, शिवसेनेनं ब-याचदा भाजपा सरकारचं समर्थन परत घेण्याच्या पोकळ धमक्या दिल्या आहेत. गिनीज बुकात नोंद होणारा हा पहिलाच अशा प्रकारचा विक्रम असेल. माझ्या या पत्रालाच नोंदणीसाठीचा अर्ज समजण्यात यावे, असे नितेश राणेंनी पत्रामध्ये नमूद केले आहे. नितेश राणे टीका करत म्हणाले की, शिवसेनेसाठी हा एक वेगळा रेकॉर्ड असेल.

नितेश राणे हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी नितेश राणे यांचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत होते. शिवसेनेच्या 1996च्या सत्ता काळात नारायण राणेंनी महसूल मंत्री आणि मुख्यमंत्रीपदासारखी महत्त्वाची खाती सांभाळली होती. गेल्या काही दिवसापूर्वी नारायण राणे काँग्रेसमध्ये नाराज असल्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते. मात्र, नारायण राणे यांच्या सर्व मागण्या भाजपकडून पूर्ण होत नाहीत. त्यामुळे राणे भाजप प्रवेशाचा निर्णय घेत नाहीत, असे समजले होते. मात्र नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. ते भाजपामध्ये आल्यास भाजपमध्ये पुन्हा दोन गट पडतील व निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांना डावलून काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना जिल्ह्यातील महत्त्वाची पदे मिळतील, अशी भीती भाजप पदाधिकाऱ्यांना वाटत असल्यामुळे भाजपा पदाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध केला होता. मात्र नारायण राणे यांनी आपला ठाम निर्णय अजूनही घेतला नसून ते 25 एप्रिलला निर्णय जाहीर करतील, अशी चर्चा होती

Web Title: Register Shivsena's name in Guinness Book- Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.