लसीसाठी ५ लाख ९५ हजार फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 03:46 AM2021-02-09T03:46:20+5:302021-02-09T03:47:46+5:30

राज्यात फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी आतापर्यंत ५ लाख ९५ हजार ६५६ कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे, यापैकी १ लाख ७० हजार मुंबईतील कर्मचारी आहेत.

Registration of 5 lakh 95 thousand frontline employees for vaccination | लसीसाठी ५ लाख ९५ हजार फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची नोंदणी

लसीसाठी ५ लाख ९५ हजार फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची नोंदणी

googlenewsNext

मुंबई : राज्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली असून आतापर्यंत एकूण ४ लाख ७२ हजार ८०५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचेही लसीकरण सुरू झाले आहे. या अधिकाधिक प्रतिसाद मिळावा याकरिता राज्य शासन आणि मुंबई पालिका प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी आतापर्यंत ५ लाख ९५ हजार ६५६ कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे, यापैकी १ लाख ७० हजार मुंबईतील कर्मचारी आहेत.

राज्यात महसूल विभागातील ३० हजार ९७४, गृह विभागातील २ लाख ६८ हजार २८९ आणि गृहनिर्माण व शहरी कामकाज विभागातील २ लाख ९६ हजार ९८४ कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या ५ लाख ९५ हजार फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांपैकी २५ हजार ६६० कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ३ फ्रेबुवारी दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु झाले, त्यात ३ फेब्रुवारीला ७९३, ४ फेब्रुवारीला ३ हजार ९२५ , ५ फेब्रुवारीला ८ हजार ७२९ आणि ६ फेब्रुवारी रोजी १२ हजार १२ हजार १५३ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

राज्यात सोमवारी ३६,२६६ लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. त्यापैकी २२,२०० आरोग्य कर्मचारी तर १४ हजार ६६ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

Web Title: Registration of 5 lakh 95 thousand frontline employees for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.