पाच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

By admin | Published: September 23, 2016 06:29 PM2016-09-23T18:29:36+5:302016-09-23T18:29:36+5:30

वारंवार पत्राद्वारे विनंती करून आणि नोटीस बजावूनही वार्षिक विवरणपत्रे व लेखापरीक्षण लेख्याच्या प्रती सादर न केल्यामुळे पाच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी राज्य

Registration of five recognized political parties | पाच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

पाच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 -  वारंवार पत्राद्वारे विनंती करून आणि नोटीस बजावूनही वार्षिक विवरणपत्रे व लेखापरीक्षण लेख्याच्या प्रती सादर न केल्यामुळे पाच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांना आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, जनता दल (सेक्युलर), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, राष्ट्रीय जनता दल, ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग या पाच इतर राज्यातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षांना 26 ऑगस्ट 2016 रोजी अंतिम नोटीस बजावण्यात आली होती. तत्पूर्वी अनेकदा त्यांना कागदपत्रे सादर करण्याबाबत लेखी विनंतीही करण्यात आली होती; परंतु त्यांनी संबंधित कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांची राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणी आता रद्द करण्यात आली आहे.                         

Web Title: Registration of five recognized political parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.