३५ पोलीस उपअधीक्षकांना नियमित पदस्थापना
By admin | Published: August 18, 2016 02:18 AM2016-08-18T02:18:14+5:302016-08-18T02:18:14+5:30
परीविक्षाधीन कालावधी पूर्ण केलेल्या राज्यातील ३५ पोलीस उपअधीक्षकांना नियमित पदस्थापना देण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून स्वतंत्र जबाबदारी
यवतमाळ : परीविक्षाधीन कालावधी पूर्ण केलेल्या राज्यातील ३५ पोलीस उपअधीक्षकांना नियमित पदस्थापना देण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे.
महासंचालक कार्यालयाने १६ आॅगस्ट रोजी यासंबंधिचे आदेश जारी केले. या अधिकाऱ्यांपैकी कुणालाही पोलीस आयुक्तालयात नेमणूक दिलेली नाही. त्यांना जिल्हा पोलीस दलात ठेवण्यात आले. काही नियुक्त्या रिक्त पदांवर झाल्या असल्या तरी अनेक ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यरत असताना आणि त्यांचा तेथील कार्यकाळ बाकी असतानाही नव्या उपअधीक्षकांना नियुक्ती देण्यात आली. या ३५ एसडीपीओंमध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पूर्वी समाज कल्याण खात्यात जातपडताळणीसाठी प्रत्येक महसूल विभागात एक पोलीस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी देण्यात आला होता. परंतु आता तेथील हे पदच रद्द करण्यात आले. त्यामुळे तेथे नियुक्त आठ उपअधीक्षकांच्या विनंतीवरून इतरत्र बदल्या करण्यात आल्या. राज्यात पोलीस उपअधीक्षकांच्या १७२ जागा रिक्त आहेत. यातील १४२ जागा पोलीस निरीक्षकांना बढती देऊन भरल्या जातील. (प्रतिनिधी)