पुनर्वसन करा, नंतर गाळ काढा!

By admin | Published: May 20, 2016 02:28 AM2016-05-20T02:28:01+5:302016-05-20T02:28:01+5:30

पवना धरणातील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. धरणातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली

Rehabilitate, then remove the mud! | पुनर्वसन करा, नंतर गाळ काढा!

पुनर्वसन करा, नंतर गाळ काढा!

Next


पवनानगर : पवना धरणातील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. धरणातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. त्या वेळी शेतकऱ्यांनी ‘अगोदर पुनर्वसन करा, नंतर गाळ काढा,’ अशी जोरदार मागणी केली. अधिकाऱ्यांशी शाब्दिक वादावादीही झाली. त्यावर मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. या प्रश्नी शुक्रवारी बैठक होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास क्षेत्र व हिंजवडी आयटी पार्क या नागरी वस्तीतील भागाला व औद्योगिक क्षेत्राला मावळ तालुक्यातील पवना धरणातून पाणीपुरवठा होतो.
पवना धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे. या कामांची पाहणी खासदार बारणे यांच्यासह तहसीलदार शरद पाटील, पवना जलसिंचन अधिकारी श्री. मटकरी, पवना जलसिंचन शाखाधिकारी मनोहर खाडे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, शरद हुलावळे, अमित कुंभार यांनी केली. (वार्ताहर)
>शेतकऱ्यांकडून शासनाचा निषेध
गेली चाळीस वर्षे पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन न झाल्याने शेतकरी संतप्त आहेत. लोकसहभागातून गाळ काढला जात आहे, ही माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील शेतकरी गाळ काढण्याच्या ठिकाणी आले. जोपर्यंत पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत गाळ काढू नये, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना केली. काम होऊ देणार नाही, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली. या वेळी आपल्या भावना शासनाला कळवून न्याय दिला जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकरी शांत झाले.$$्रिपुनर्वसनाचा प्रश्न
पवना धरणातील सुमारे साडेतीनशे शेतकऱ्यांचे पुनर्वसन झाले आहे. मात्र, उर्वरित साडेआठशे शेतकऱ्यांचे पुनर्वसन झालेले नाही. शेतकरी संघटनांनी केलेल्या पाहणीत आता पुनर्वसन शेतकऱ्यांची संख्या बाराशेवर गेली आहे. या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करायलाच हवे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांचे पुनर्वसन मावळ परिसरातच करून प्रत्येकाला एक एकर क्षेत्र द्यावे, तसेच महापालिकेत नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण ठेवावे, अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी मांडल्या.

Web Title: Rehabilitate, then remove the mud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.